AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hanuman Jayanti 2021 | हनुमान जयंतीला विशेष योगायोग, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि मंत्र

हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीचा सण साजरा केला जातो. आज हनुमान जयंती (Hanuman Jayanti) आहे. हनुमान जी शक्ती, बुद्धिमत्ता आणि विद्येचे प्रतीक मानले जातात.

Hanuman Jayanti 2021 | हनुमान जयंतीला विशेष योगायोग, जाणून घ्या शुभ मुहूर्त, महत्व आणि मंत्र
Lord Hanuman
| Updated on: Apr 27, 2021 | 8:51 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मानुसार चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंतीचा सण साजरा केला जातो. आज हनुमान जयंती (Hanuman Jayanti) आहे. हनुमान जी शक्ती, बुद्धिमत्ता आणि विद्येचे प्रतीक मानले जातात. या दिवशी हनुमानजीची पूजा केल्यास भक्तांचे सर्व कष्ट दूर होतात. मंगळवारी हनुमान जयंती पडत आहे. हा दिवस हनुमानाला समर्पित आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व अजून वाढले आहे (Hanuman Jayanti 2021 Know The Shubh Muhurat Puja Vidhi And Importance Of This Day).

या दिवशी भक्त विधीवित हनुमानजीची पूजा करतात. त्याचबरोबर काही लोक उपवास देखील ठेवतात. यावेळी हनुमान जयंतीवर शुभ योगायोग येत आहेत. हनुमान जयंतीच्या दिवशी सिद्धी आणि व्यातीपाट नावाचे दोन योगायोग जुळत आहेत. सिद्धी योगात केलेली उपासना यशस्वी होते. सिद्धी योग 8 वाजून 3 मिनिटांसाठी सिद्धी योग असेल. या योगाची उपासना केल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते.

पूजेचा शुभ काळ

पौर्णिमा तिथी आरंभ – 26 एप्रिल 2021 दुपारी 12 वाजून 44 मिनिटांपर्यंत

पौर्णिमा तिथी समाप्त – 27 एप्रिल 2021 च्या रात्री 9 वाजून 1 मिनिटांपर्यंत

पूजेची पद्धत

हनुमान जयंतीनिमित्त सुंदरकांडचे पठण करणे शुभ आहे. जे लोक सुंदरकांडचं पठण करतात त्यांच्याजीवनात कोणतीही अडचण येत नाही. हा पाठ केल्यास भगवान राम यांचे आशीर्वाद मिळतात. आपण पाठ करु शकत नसाल तर नक्कीच ऐका. यानेही फायदा होईल. या विशेष दिवशी भक्त गरीबांना जेवण देतात. तसेच दान देण्याचे विशेष महत्त्व आहे.

या दिवसाचे महत्त्व

हनुमान हा भगवान शिवांचा 11 वा अवतार आहे. हनुमानजी वेगवेगळ्या नावांनी परिचित आहेत. या दिवशी भगवान हनुमानाचा जन्म झाला होता. हनुमान जी आपले सर्व त्रास दूर करतात, म्हणूनच त्यांना संकंटमोचक म्हणून ओळखले जाते.

या मंत्रांचा जप करावा

हनुमान जयंतीच्या दिवशी संकंमोचक हनुमान मंदिरात लाल चोला अर्पण करावा. यानंतर तूप किंवा तेलाचा दिवा लावा आणि हनुमान चालीसाचे पठण करावे. यानंतर 11 वेळा हनुमान मंत्रांचा जप करावा.

ऊं हनुमते नमः

ऊं अंजनेयाय विद्महे वायुपुत्राय धीमहि। तन्नो हनुमत प्रचोदयात्

ऊं ऐं भीम हनुमते श्री राम दोत्याय नमः

ऊं दैत्यनुमुखाय पंचमुख हनुमते करलाबलदाय

मंगल भवन अमंगलहारी द्रवहु सो दशरथ अजिर विहारी

Hanuman Jayanti 2021 Know The Shubh Muhurat Puja Vidhi And Importance Of This Day

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Hanuman Ji | बजरंगबली कृपा हवी असेल तर मंगळवारच्या दिवशी ‘हे’ उपाय करा

Lord Hanuman | मंगळवारी ‘ही’ कामं टाळा, नाहीतर हनुमंत होतील नाराज

Follow Us
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात
उद्धव नाही, आदित्य नाही, ठाकरे गटाचे निर्णय फक्त राऊतच घेतात.
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा
राष्ट्रवादी आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा.
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल
अखेरच्या दिवशी महायुती व मविआकडून प्रमुख उमेदवारांचे अर्ज दाखल.
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल
राज्यसभेसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस; शरद पवारांचा अर्ज दाखल.
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका
अमेरिका–इराण संघर्षाचे पडसाद; जळगावच्या चटई उद्योगाला मोठा फटका.
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप
रोहित पवारांचा व्हीएसआर कंपनीवर कागदपत्र फेरफारीचा आरोप.
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले
जेएनपीएमध्ये केळी, कांदा, द्राक्षे, तांदळाचे हजारो कंटेनर अडकले.
VSR कंपनीच्या मालकाची CID चौकशी सुरू; जय पवारांच्या ट्विटनंतर कारवाई
VSR कंपनीच्या मालकाची CID चौकशी सुरू; जय पवारांच्या ट्विटनंतर कारवाई.
पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात; नागरिकांमध्ये संताप
पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषणाच्या विळख्यात; नागरिकांमध्ये संताप.
संजय राऊत आणि रामदास आठवलेंची गळाभेट; राजकीय चर्चांना उधाण
संजय राऊत आणि रामदास आठवलेंची गळाभेट; राजकीय चर्चांना उधाण.