AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?

IRCTC Bharat Gaurav Train: भारतीय रेल्वे अथवा मुंबईत लोकल प्रवासात अनेकदा भजनाचा, भारूडाचा, आरती कानावर येते आणि आपण दचकतो. गणेशोत्सवाच्या काळात, दुर्गा उत्सवाच्या काळातही रेल्वेत मोठा उत्साह असतो. पण रेल्वेत खरंच पूजा करता येते का?

Bharat Gaurav Train: तुम्ही ट्रेनमध्ये करू शकता पूजा? टुरिस्ट रेल्वे इतकी खास का?
गौरव भारत ट्रेन
| Updated on: Apr 02, 2026 | 4:07 PM
Share

IRCTC धार्मिक यात्रेला आणि उत्सवाला प्रोत्साहन देते. त्यासाठी विशेष भारत गौरव ट्रेनची सुरूवात करण्यात आली आहे. या ट्रेनमध्ये प्रवाशांना सकाळ-संध्याकाळ विधीवत पूजा करता येते. आरती करता येते. या ट्रेनमध्ये भजन आणि किर्तन करता येते. ही रेल्वे वयोवृद्धांसाठी अत्यंत खास मानली जाते. या रेल्वेत भजनासह विविध धार्मिक स्थळांना भेट देता येते. भारत गौरव ट्रेन ही देशातील पहिली धार्मिक यात्रेसाठीची रेल्वे आहे. या ट्रेनच्या बाहेरील बाजूस भारतीय स्थापत्य कला, विविध मंदिरं आणि संस्कृतीशी संबंधित चित्रं रेखाटलेली असतात.

या ट्रेनमध्ये स्लीपर कोचपासून ते एसी कोचपर्यंतच्या सोयी-सुविधा असतात. यामध्ये जवळपास 600-700 आसनांची व्यवस्था असते. सुरक्षेसाठी प्रत्येक डब्यात सीसीटीव्ही असतात. तर या प्रवासादरम्यान खास लज्जतदार आणि शाकाहारी जेवण्याची आणि उपवासाच्या पदार्थांची रेलचेल असते. ही ट्रेन पूर्णपणे वातानुकूलित असते. यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड एसची सुविधा मिळते. यासह या रेल्वेत विविध सोयी-सुविधाही मिळतात.

कर्नाटक सरकार आणि IRCTC च्या मदतीने ही खास ट्रेन धावते. ही ट्रेन काशी, प्रयागराज, गया आणि अयोध्या सारख्या पवित्र धार्मिक स्थळांची यात्रा घडवतात. विशेष म्हणजे कर्नाटक सरकार या रेल्वेसाठी प्रवाशांना खास सबसिडी, सवलत सुद्धा देते. भारत गौरव ट्रेन मुख्यत्वे रामायण सर्किट, ज्योतिर्लिंग यात्रा आणि दक्षिण दर्शन सारख्या प्रसिद्ध पर्यटन आणि धार्मिक स्थळाला जोडतात. ही ट्रेन धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्रांने जोडते. त्यामुळे प्रवाशांना सर्वदूर फिरता येते.

कसे करता येईल बुकिंग?

भारत गौरव ट्रेनची बुकिंग करणे अगदी सोपं आहे. त्यासाठी रेल्वे स्टेशनवर जाण्याची गरज नाही. प्रवासी IRCTC च्या अधिकृत साईटवर irctctourism.com जाऊन आवडीचे पॅकेज आणि प्रवासाचा बेत आखू शकतात. या साईटवर तुम्हाला या विविध पॅकेजची डिजिटल माहिती मिळते. तसेच खर्च आणि प्रवासाचा कालावधी याची माहिती मिळते. तसेच या प्रवासात प्रवाशांना, यात्रेकरूंना काय काय सुविधा मिळतात हे समोर येईल.

Follow Us
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार
बापरे! शौचालयाच्या पाण्याने बनवली इडली? दादर स्टेशनबाहेर गंभीर प्रकार.
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको
मी तुला सोडतो.. सुनसान रस्त्यात कार थांबवली अन्... महिला वकिलसोबत नको.