AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरु आणि केतूची युती होणार! ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस ‘या’ 4 राशींना मिळणार सर्व फायदे

ग्रहांची युती झाल्यानंतर 12 राशींवर चांगले वाईट परिणाम होत असतात. शास्त्रनुसार, गुरु आणि केतूची युती होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ही युती झाल्यास ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस 'या' 4 राशींना सर्व फायदे मिळतील... तर जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी...

गुरु आणि केतूची युती होणार! ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस 'या' 4 राशींना मिळणार सर्व फायदे
Zodiac Signs
| Updated on: Oct 10, 2026 | 4:47 PM
Share

हिंदू धर्मात प्रत्येक ग्रहाला त्याचं वेगळं स्थान आहे. अशात ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू ग्रहाला देवांचा गुरू मानलं जातं. हा एक अत्यंत शुभ ग्रह मानला जातो. गुरू ग्रह धनु आणि मीन राशींचा स्वामी मानला जातो. हा गुरू एका राशीत वर्षभर भ्रमण करणार असल्याने, गुरूच्या गोचराचा व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव पडेल. गुरु सध्या त्याच्या उच्च राशी, कर्क राशीत भ्रमण करत आहे. या स्थितीत, 31 ऑक्टोबर रोजी सिंह राशीत प्रवेश करेल. जरी सर्व राशींना याचा फायदा होणार असला तरी, काही राशी भाग्यवान ठरतील. त्यामुळे त्या चार राशी कोणत्या आहेत, ज्याचा फायदा सर्व राशींना मिळणार आहे. यामध्ये सर्वात पहिली रास मेष आहे.

मेष : मेष राशीच्या पंचम घरात गुरू आणि केतूची युती होईल. यामुळे या राशींना नवीन आर्थिक लाभ मिळेल. बऱ्याच काळापासून पडून असलेला पैसा तुमच्या हाती येईल. तुम्हाला अनेक अनपेक्षित नवीन मार्गांनी पैसा मिळेल. जे काम करतात त्यांना कार्यालयात नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि पगारवाढीची संधी मिळेल. व्यावसायिकांना नवीन कंत्राटे मिळतील, ज्यामुळे चांगला नफा होईल.

कर्क : गुरु आणि केतूची युती कर्क राशीच्या दुसऱ्या घरात होणार आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्तींची आर्थिक आणि व्यावसायिक प्रगती चांगली होईल. उत्पन्नात चांगली वाढ होण्याची आणि गुंतवणुकीत चांगला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जे नोकरी करत आहेत, त्यांना दीर्घकाळाच्या मेहनतीमुळे पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. तथापि, कोणताही आर्थिक निर्णय अत्यंत काळजीपूर्वक घ्यावा.

सिंह : सिंह राशीच्या पहिल्या घरात गुरू आणि केतूची युती होईल. यामुळे या राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल. व्यावसायिकांना चांगला नफा मिळवून देणारे नवीन करार मिळण्याची संधी आहे. जे काम करतात त्यांना कार्यालयात पदोन्नती मिळेल. तुम्हाला पगारवाढीबाबत चांगली बातमी मिळू शकते. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम यशस्वीरित्या पूर्ण होईल. विशेषतः या काळात तुम्हाला समाजातील प्रभावशाली लोकांची मैत्री लाभेल.

धनु : गुरु आणि केतूची युती धनु राशीच्या नवव्या घरात होणार आहे. त्यामुळे या राशींचे भाग्य उजळेल आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीत चांगली वाढ होईल. यासोबतच व्यवसायात चांगल्या प्रगतीच्या संधी मिळतील. व्यावसायिकांना अपेक्षित नफा मिळेल. जे आतापर्यंत पैशांच्या समस्येशी झगडत आहेत, त्यांना गुरुच्या या गोचरानंतर आर्थिक चालना मिळेल.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
परभणीत पाणीटंचाईचे भीषण संकट! करपरा प्रकल्पात केवळ 3% पाणीसाठा शिल्लक
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय?
ताब्यात घेऊन दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अनोळखी ठिकाणी ठेवलंय, बड्या नेत्याचा दावा