Lakshmi Pujan 2025 : लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सायंकाळच्या वेळी करा हे सोपे उपाय, घरात येईल पैसाच पैसा
दिवाळी हा हिंदू धर्मामधील सर्वात मोठा सण आहे, दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन केलं जातं, लक्ष्मी पूजनावेळी केल्या जाणाऱ्या काही सोप्या उपायांबाबत आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे, आनंद आणि प्रकाशाचा उत्सव म्हणून दिवाळी हा सण साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजन केलं जातं. या वर्षी 21 ऑक्टोबर 2025 मंगळवारी सायंकाळी लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त आहे, वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी पूजनाच्या दिवशी काही सोपे उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात तुम्हाला धनाची कधीच कमतरता जाणवत नाही, तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर होतात. चला तर मग दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या वेळी केल्या जाणाऱ्या चार सोप्या उपायांबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.
सूर्यास्तानंतर तुळस किंवा पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावा – लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सूर्यास्त होताच तुळस किंवा पिंपळाच्या झाडा जवळ तुपाचा दिवा लावा, दिव्याला चारही बाजूने वात ठेवा, दिवा लावताना लक्ष्मी मातेचं नामस्मरण करा, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सायंकाळी तुळशी जवळ दिवा लावल्यानं लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहतो, घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.
घराच्या मुख्य दरवाजा जवळ पाच दिवे लावा – दिवाळीच्या दिवशी सांयकाळच्या वेळी घराच्या मुख्य दरवाजा जवळ पाच दिवे लावा, त्यातील एक दिवा हा उत्तर-पूर्व दिशेला अर्थात ईशान्य दिशेला असावा, या उपायामुळे घरातील गरीबी नष्ट होऊन, घराची भरभराट होते.
लक्ष्मी पूजनानंतर तिजोरीत 11 कवड्या ठेवा – लक्ष्मी मातेला कवडी ही अत्यंत प्रिय असते, त्यामुळे लक्ष्मी पूजनात कवड्यांचं देखील खूप महत्त्व आहे, लक्ष्मी पूजनावेळी 11 कवड्या लक्ष्मी मातेच्या प्रतिमेसमोर ठेवा त्यानंतर त्या कवड्या एका लाल कापडामध्ये गुंडाळून तिजोरीत ठेवा, या उपायामुळे तुमची तिजोरी कधीही खाली राहत नाही, तुमच्या घरात विविध मार्गाने सतत पैसा येत राहतो.
लक्ष्मी पूजनावेळी लक्ष्मी मातेच्या प्रतिमे समोर काळी हळद आणि चांदीचा एक शिक्का ठेवा. लक्ष्मी पूजन झाल्यानंतर हा चांदीचा शिक्का हा तुमच्या पाकिटात किंवा तिजोरीमध्ये ठेवून द्या, यामुळे घराची आर्थिक भरभराट होते, घरात सुख समृद्धी येते.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
