Chanakya Niti: पैशांचे ‘हे’ रहस्य कधीही कोणाला सांगू नका, अन्यथा पश्चात्ताप होईल!

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीतिमध्ये अनेक अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आपल्यासाठी आज फार महत्त्वाच्या ठरत आहे. तर चाणक्य यांनी पैशांबद्दल देखील एक सल्ला दिला आहे. चाणत्या म्हणतात या पैशांचे 'हे' रहस्य कधीच कोणाला सांगू नका.

Chanakya Niti: पैशांचे हे रहस्य कधीही कोणाला सांगू नका, अन्यथा पश्चात्ताप होईल!
| Updated on: Nov 16, 2026 | 2:11 PM

Chanakya Niti: आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत. पण घरातील वातावरण, कार्यालयातील वातावरण, मित्रमंडळी, कोणावर विश्वास ठेवायाचा आणि कोणावर नाही. याबद्दल अनेक गोष्टी चाणक्य यांनी सांगितल्या आहेत. तर चाणक्य यांनी पैशांबद्दल देखील सांगितलं आहे. पैशांतं कोणतं रहस्य आपण लपवलं पाहिजे, यावर चाणक्य यांनी मोठा खुलासा केला आहे. अनेकदा आपल्या आपल्या जवळच्या लोकांना पगारापासून ते बँक बॅलन्सपर्यंत, सर्व काही सांगतात, पण प्रत्येक आर्थिक बाब इतरांना सांगणं योग्य नाही, असं आचार्य चाणक्य स्पष्ट म्हणतात. त्यांच्या मते, जेव्हा आपण प्रत्येक आर्थिक गुपित इतरांना सांगतो, तेव्हा भविष्यात समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. तर, जाणून घ्या कोणत्या आर्थिक बाबी गुप्त ठेवणं सर्वोत्तम आहे.

आचार्य चाणक्यांच्या मते, पगार सर्वांना कधीच कोणाला सांगायचा नाही. खरं तर, तुमचा पगार कळल्यावर लोक स्वतःची तुमच्याशी तुलना करतात. आणि त्यांच्या मनात तुमच्याबद्दल मत्सर निर्माण होण्याची शक्यता असते. शिवाय, जर तुमचा पगार इतरांपेक्षा कमी असेल, तर ते तुम्हाला कमी लेखण्याची शक्यता असते. म्हणून, आपल्या पगाराबद्दल कोणालाही सांगू नका.

Loading...

अनेक लोक पगाराव्यतिरिक्त इतर मार्गांनी पैसे कमावतात, त्यांना कंपनीकडून चांगला बोनस मिळतो. तर काहींना जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळतो. काही जण आपल्या कामासोबत छोटी-मोठी कामे करून अतिरिक्त पैसे कमावतात. आचार्य चाणक्य म्हणतात की, याबद्दल देखील कोणाला सांगण्याची गरज नाही. कारण तुमच्याकडे खूप पैसे आहेत हे कळल्यास, काही लोक तुमच्याकडून पैसै घेण्यासाठी बहाणा करतील. अनेक लोक पैसे तर घेतात, पण पैसे परत करताना उशीर करतात. याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर मोठा परिणाम होतो.

बरेच लोक दर महिन्याला आपल्या पगारातील थोडी रक्कम बँकेत जमा करतात. या बचतीबद्दल कोणालाही सांगू नका. कारण तुमच्याकडे खूप पैसे आहेत हे जर त्यांना कळले, तर मित्र आणि नातेवाईक तुमच्याकडे पैसे मागतील. जर तुम्ही कर्ज मागितलं आणि ते फेडले नाही, तर यामुळे तुमच्या नात्यात दुरावा देखील निर्माण होऊ शकतो. म्हणून तुम्ही किती पैसे वाचवले आहेत हे कोणालाही सांगू नका. ही गोष्ट शक्य तितकी गुप्त ठेवा.

चाणक्य म्हणतात की घर खरेदी करणं, नवीन व्यवसाय सुरू करणं किंवा पैसे गुंतवणे यांसारख्या कल्पना प्रत्येकाशी शेअर करण्याची गरज नाही. जेव्हा अशा योजना इतरांना सांगितल्या जातात, तेव्हा ते त्यांच्या सूचना देऊ लागतात. या सूचनांमुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे आपण चुकीचे पाऊल उचलण्याची शक्यता असते. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us