AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील असं गाव जेथे घरांना नाहीत दरवाजे, चोरी तर कधी होतच नाही, काय आहे रहस्य?

भारतात असे अनेक रहस्य दडलेले आहेत, जे फार पूर्वीचे आहेत. त्यातील एक म्हणजे असं गाव जेथे घरांना दरवाजे नाहीत आणि चोरी देखील होत नाही... तर जाणून घ्या ते गाव कोणतं आहे आणि त्या गावचं रहस्य नेमकं काय आहे.

भारतातील असं गाव जेथे घरांना नाहीत दरवाजे, चोरी तर कधी होतच नाही, काय आहे रहस्य?
| Updated on: Oct 01, 2026 | 9:31 AM
Share

आपण घराबाहेर पडतो तेव्हा दरवाजाला कुलूप लावून निघतो आणि कुलूप व्यवस्थित लागला आहे की नाही, हे देखील पाहतो.. पण महाराष्ट्रातील एक गाव असं आहे, जेथे घरांना आणि दुकानांना दारच नाही. सांगायचं झालं तर, केवळ घरांनाच नव्हे, तर दुकानांनी देखील कुलूप न लावण्याची ही दुर्मिळ परंपरा येथे पिढ्यानपिढ्या पाळली जात आहे. या दुर्मिळ परंपरेमुळे देशभरात प्रसिद्ध असलेले गाव म्हणजे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील ‘शनी शिंगणापूर’. ‘कुलूपविरहित गाव’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावामागील चमत्कार आणि आध्यात्मिक रहस्याबद्दलची काही रंजक माहिती जाणून घ्या…

या गावात घरांना कुलूप न लावण्यामागचे मुख्य कारण म्हणजे येथील लोकांची शनिदेवावर असलेली गाढ श्रद्धा. स्थानिकांचा असा ठाम विश्वास आहे की, शनिदेव या संपूर्ण गावाचं रक्षक आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत चोरी करण्याचं धाडस कोणीही करत नाही. येथील लोकांमध्ये अशी तीव्र भक्ती आणि भीती आहे की, जर कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला किंवा काही चुकीचं कृत्य केलं, तर ते शनिदेवाच्या कोपाला बळी पडतील आणि त्यांना तात्काळ शिक्षा मिळेल. म्हणूनच येथील लोक सांगतात की, अनेक दशकांपासून त्यांना आपली घरे आणि मालमत्ता कुलूपबंद करण्याची गरज भासलेली नाही.

शनी शिंगणापूर येथील शनीदेवाची मूर्ती स्वयंभू मानली जाते आणि ती अत्यंत पवित्र मानली जाते. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणताही भव्य गर्भगृह किंवा छत नाही. शनीदेवाची काळ्या पाषाणाची मूर्ती मोकळ्या जागेत स्थापित करून तिची पूजा केली जाते.

सर्वात महत्त्वाचं सांगायचं झालं तर, कुलूप किंवा दरवाजे नसलेल्या या घरांची रचना आणि वास्तुकला देखील सामान्य घरांपेक्षा वेगळी दिसते. ही अनोखी परंपरा आणि येथील आध्यात्मिक वातावरण पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी देशभरातून आणि परदेशातून दररोज हजारो पर्यटक आणि भाविक शनी शिंगणापूरला भेट देतात.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?