AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2026 : नवरात्रीमध्ये ‘या’ राशींचं उजळेल भाग्य, कोणती आहे तुमची रास?

Navratri 2026 : हिंदू धर्मात नवरात्रीला फार मोठं महत्त्व आहे. अशात ग्रहांच्या बदलांचा परिणाम हा 12 राशींवर होत असतो. तर ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींचं भाग्य नवरात्रीच्या दिवसांमध्ये उजळणार आहे.

Navratri 2026 : नवरात्रीमध्ये 'या' राशींचं उजळेल भाग्य, कोणती आहे तुमची रास?
Navratri 2026
| Updated on: Oct 11, 2026 | 1:16 PM
Share

Navratri 2026 : आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे. हिंदू धर्मात नवरात्रीला फार मोठं महत्त्व असतं. या दिवसांमध्ये देवदेवतांची पूजा करतात. तर ग्रहमान देखील बदलतात, ज्याचे चांगले वाईट परिणाम राशींवर होत असतात. सांगायचं झालं तर, नवरात्रीचा काळ हा एक अतिशय विशेष काळ आहे आणि याच काळात देवी भगवतीचा आशीर्वाद विविध रूपांत भक्तांपर्यंत पोहोचतो. तसेच, नऊ दिवस देवी भगवतीची पूजा करणाऱ्यांवरही या काळात आशीर्वादांचा वर्षाव होतो. त्यामुळे जाणून घ्या नवरात्रीत कोणत्या राशींना लाभ मिळेल आणि त्यांच्या आयुष्यात कोणते बदल घडतील… त्यांच्यासाठी हा काळ व्यवसाय, उत्पन्न, नोकरी आणि विवाह यांमध्ये मोठे बदल घडवणारा असणार आहे.

कोणती आहे तुमची रास?

धनु : धनु राशीच्या लोकांना देवी दुर्गेचा सर्व आशीर्वाद प्राप्त होईल. त्यांच्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या आर्थिक समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नवरात्रीदरम्यान व्यावसायिकांचा नफा दुप्पट होईल. देवी दुर्गेच्या आशीर्वादाने तुमच्या घरात शुभ कार्ये होतील. यासाठी तुम्हाला संकेतही मिळतील.

कुंभ : कुंभ राशीसाठी हा शुभ काळ आहे. बेरोजगार व्यक्तींना नोकरीची चांगली संधी मिळेल. ज्यांना परदेशात जायचं आहे, त्यांची स्वप्ने पूर्ण होतील. न्यायालयीन खटले आणि मालमत्तेचे वाद तुमच्या बाजूने निकाली निघतील. आरोग्याच्या समस्या कमी होतील आणि तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

तूळ : नवरात्रीदरम्यान तूळ राशीच्या लोकांना अत्यंत आनंद देणाऱ्या गोष्टी घडतील. कुटुंबात सुख आणि शांती नांदेल. वैवाहिक जीवनातील कलह नाहीसे होतील. नवीन घर आणि वाहन खरेदी होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतील. समाजात तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल.

मीन : मीन राशीच्या लोकांना विविध प्रकारे शुभ आशीर्वाद मिळतील. ते कर्जातून मुक्त होतील. मीन राशीच्या लोकांना लवकर आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. ते त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये यशस्वी होतील. ज्यांना मूलबाळ नाही, त्यांना संतती होण्याची संधी मिळेल. देवीची पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Follow Us
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवास्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस...
CJP आंदोलनातील अभिजित दिपके यांच्यासह तिन्ही नेत्यांना जामीन, पोलिस कोठडीतून सुटका
मोठी बातमी! CJP च्या दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर...
मोठी बातमी! CJP च्या अभिजीत दिपके, सौरव दास, रांका यांची सुटका, हमीपत्रावर लिहून घेतली अट