AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Navratri 2026 : नवरात्रीचे 9 रंग समोर, कोणत्या दिवशी कोणता रंग? आजच सुरु करा तयारी

Navratri 2026 : नवरात्रीचे रंग कोणते? असा प्रश्न आता तुम्हाला देखील पडला असेलच. तर जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता रंग आहे. रंगांच्या साड्या आणि ड्रेसची आजपासूनच सुरु करा तयारी.

Navratri 2026 : नवरात्रीचे 9 रंग समोर, कोणत्या दिवशी कोणता रंग? आजच सुरु करा तयारी
| Updated on: Sep 22, 2026 | 12:54 PM
Share

Navratri 2026 : गणेशोत्सवानंतर आता सर्वांना नवरात्रीची प्रतिक्षा आहे. यंदाच्या वर्षी शारदीय नवरात्री 2026 रविवार, 11 ऑक्टोबर रोजी सुरू होईल आणि सोमवार, 19 ऑक्टोबर रोजी समाप्त होणार आहे. ऑक्टोबर रोजी विजयादशमी (दसरा) सह नवरात्री समाप्त होईल. दरवर्षी नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गामातेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटलं जातं. नवरात्रीच्या दिवसांत नऊ दिवसांचे नऊ रंग ठरलेले असतात आणि महिला मोठ्या उत्साहाने हे नऊ रंग घालतात. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात. नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे (Nine Colours) कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे. यंदाच्या नऊ रंगांबद्दल जाणून घेऊया.

नवरात्रीच्या नऊ रंग

11 ऑक्टोबर – रविवार : नारंगी

12 ऑक्टोबर -सोमवार : पांढरा

13 ऑक्टोबर – मंगळवार : लाल’

14 ऑक्टोबर – बुधवार :रॉयल ब्लू

15 ऑक्टोबर – गुरुवार : पिवळा

16 ऑक्टोबर – शुक्रवार : हिरवा

17 ऑक्टोबर – शनिवार : राखाडी

18 ऑक्टोबर – रविवार : जांभळा

19 ऑक्टोबर – सोमवार : मोरपंखी हिरवा

सांगायचं झालं तर, हा नऊ दिवसांचा उत्सव दुर्गा देवीच्या नऊ रूपांना समर्पित आहे. या काळात देवीच्या प्रत्येक रूपाची पूजा केली जाते. या प्रत्येक दिवसासाठी एक विशिष्ट रंग ठरलेला असतो. हे रंग केवळ परंपरेचा भाग नसून, त्यांचे आध्यात्मिक महत्त्वही आहे. यातील प्रत्येक रंग देवीच्या विशिष्ट गुणांचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जातो. या नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे परिधान केल्याने देवीचा विशेष आशीर्वाद मिळतो, असे म्हटले जाते. शारदीय नवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे. अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून नवमीपर्यंत हा सण साजरा केला जातो

एवढंच नाही कर, शारदीय नवरात्रीचं नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानलं गेलं आहेत. नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती, ज्ञान, समृद्धी व वैभव प्राप्त होतं अशी धार्मिक श्राद्धा आहे. हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची...
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची शक्यता
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क..
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85 रुग्णवाहिका, 34 क्रेन अन्...
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकरी संकटात
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकऱ्याची व्यथा ऐकून डोळे पाणावतील
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत राऊत...
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचं विधान
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर...
भाजपमध्ये जाणाऱ्या काँग्रेस नेत्याला थेट राहुल गांधींचा फोन; नंतर... नेमकं काय घडलं?
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त