पितृपक्षात करा हा खास उपाय, पितृदोष होईल दूर, मिळेल पूर्वजांचा आशीर्वाद
पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. या काळात आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी तसेच त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा, आणि पितृदोष दूर व्हावा यासाठी विविध उपाय केले जातात. आज आपण अशाच एका उपायाबद्दल जाणून घेणार आहोत. पितृपक्षात हा उपाय केल्यास पितृदोषातून सुटका मिळते.

पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी विविध उपाय केले जातात. जसं की तर्पण, पूर्वजांच्या नावाने दान धर्म, पक्ष असे विविध उपाय केले जातात. हिंदू धर्मशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो, तेव्हा जर त्याच्या काही इच्छा या अपूर्ण असतील तर त्याला लवकर मोक्षाची प्राप्ती होत नाही. यामुळे संबंधित कुटुंबामध्ये पितृदोष निर्माण होतो. पितृदोषामुळे तुमच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. जसं की तुमच्यासाठी एखादं काम खूप महत्त्वाचं असतं, परंतु त्यामध्ये सतत काही न काही अडथळे येत राहतात. घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होत नाही. कायम आर्थिक समस्या निर्माण होतात. कुटुंब प्रमुखाच्या पाठीमागे कोणत्या कोणत्या गोष्टीची सतत चिंता लागून राहते. घरात आरोग्याच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात. या सर्व गोष्टी घडू नये, आपल्या पूर्वजांना शांती मिळाली, ते आपल्यावर प्रसन्न व्हावे, पितृदोषातून आपली मुक्ती व्हावी यासाठी पितृपक्षात काही खास उपाय केले जातात. त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाऊन घेणार आहोत. हा उपाय पितृपक्षात केल्याने पितृदोष दूर होतो.
हिंदू धर्म आणि वास्तुशास्त्रामध्ये पितृदोष दूर करण्यासाठी विविध उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातीलच हा सर्वात सोपा उपाय आहे. एक पंचमुख कणकेचा दिवा तयार करयाचा आहे, ज्यामध्ये तोडा गूळ मिक्स करावा. हा पंचमुखी दिवा पाचही बाजुने प्रज्वलीत करून पितृपक्षात आपल्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याबाहेर ठेवावा. या उपायामुळे पितृदोष दूर होण्यास मदत होते. तसेच पितृदोषामुळे घरात ज्याकाही समस्या निर्माण होत आहेत, त्यापासून देखील आपल्याला सुटका मिळते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तुम्ही असा दिवा घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा एखाद्या पिंपळाच्या झाडाखाली देखील ठेवू शकता.
त्याच प्रमाणे दुसरा एक सोपा उपाय आहे. तो म्हणजे पितृपक्षाच्या काळात तुम्हाला शक्य होईल तितक्या जसं की आकरा, एकवीस अशा प्रदक्षिणा पिंपळाच्या झाडाला घालाव्यात. रोज सकळी अंघोळ केल्यानंतर सर्वात आधी हे काम करावं, यामुळे देखील पितृदोष दूर होतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
