AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru dosh : पितृदोष निवारणासाठी पितृपक्षात करा हा खास उपाय, पूर्वजांचा मिळेल आशीर्वाद

अनेकदा आपल्या पूर्वजांच्या काही इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतात. त्यामुळे घरात पितृदोष निर्माण होतो. घरात पितृदोष निर्माण होऊ नये, पर्वजांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा यासाठी पितृपक्षात विविध उपाय केले जातात, त्यातीलच एका उपायाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. यामुळे तुमच्या घरातील पितृदोष दूर होतो.

Pitru dosh : पितृदोष निवारणासाठी पितृपक्षात करा हा खास उपाय, पूर्वजांचा मिळेल आशीर्वाद
पितृदोष Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 8:46 PM
Share

अनेकदा आपल्या पूर्वजांच्या काही इच्छा या अपूर्ण राहिलेल्या असतात, किंवा पूर्वजांना आपल्याकडून काही अपेक्षा असतात. जर या अपेक्षांची पूर्तता झाली नाही तर तुमच्या घरात पितृदोष निर्माण होतो. ज्या घरात पितृदोष निर्माण होतो, त्या घरात पैसा कधीच टिकत नाही. तुम्ही कितीही कष्ट करा, तुमच्या हातात पैसा तर येतो, मात्र दुसऱ्याच क्षणी तो कोणत्या न कोणत्या कारणामुळे खर्च होतो. त्याच प्रमाणे पितृदोषाचा दुसरा महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या महत्त्वाच्या कामात अनेकदा विलंब होतो, काही न काही अडचणी निर्माण होतात. घरात काहीही कारण नसताना अचानक वादविवाद वाढतात. कुटुंबातील व्यक्तींचं एकमेकांसोबत पटत नाही, या सारखे संकेत मिळत असतात. त्यामुळे पितृदोष दूर करणं गरजेचं असतं. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे, अशा व्यक्तींसाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय पितृपक्षात केले तर आपल्याला इच्छित फळाची प्राप्ती होऊन पितृदोष दूर होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. आज आपण अशाच एका सोप्या उपायाबद्दल माहिती जाऊन घेणार आहोत.

पितृपक्ष किंवा पितृपंधरवाडा हा हिंदू धर्मामध्ये महत्त्वाचा मानला जातो. आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचा हा काळ असतो.घरातील पितृदोष दूर व्हावा, आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद सदैव आपल्यावर राहावते, यासाठी लोक पितृपक्षात विविध उपाय करतात. जसं की पित्रांच्या नावाने तर्पण केलं जातं. पित्रांचं श्राद्ध घातलं जातं. त्यांचं स्मरण केलं जातं. आपल्या पूर्वजांच्या नावाने या काळात दान धर्म देखील केला जातो, यामुळे तुमचे पूर्वज समाधानी होतात, घरातील पितृदोषाचा त्रास कमी होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र या व्यतिरिक्त देखील तुम्ही आणखी एक उपाय करू शकता.

पितृपक्षामध्ये एक मातीचं किंवा धातूचं छोटं भांड घ्या, त्यामध्ये गायीच्या शेणापासून बनवलेली गौरी टाकावी, त्या गौरीवर थोडा भिमसेनी कापूर टाकावा, तसेच एक दोन लंवगा देखील टाकाव्यात लंवगामुळे तुमच्या घराच्या आसपास असलेली सर्व प्रकारची नकारात्मक शक्ती दूर होते. त्यानंतर यामध्ये थोडे काळे तीळ टाकावेत, थोडं शुद्ध गावरान तूप देखील टाकावं, हे मिश्रण पेटवावं आणि याचा धूर संपूर्ण घरात फिरवावा, त्यानंतर हे भांड तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून ठेवून द्यावं, पितृ पक्षाच्या पंधरवाड्यात तुम्ही कधीही हा उपाय करू शकतात, या उपायामुळे तुमच्या घरातील पितृदोष दूर होतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर