AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pitru Dosha: पूर्वज क्रोधित झाल्यावर ही 7 लक्षणे दिसतात, तुमच्या घरात जाणवत आहेत?

Pitru Dosha: लवकरच पितृपक्षाला सुरुवात होणार आहे. पितृपक्षामध्ये आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं जातं. पण पूर्वज आपल्यावर नाराज असतील तर, ही 7 लक्षणं तुम्हाला दिसतील. तर जाणून घ्या तुमच्या घरात काही हे लक्षणं जावणत असतली तर काय कराल...

Pitru Dosha: पूर्वज क्रोधित झाल्यावर ही 7 लक्षणे दिसतात, तुमच्या घरात जाणवत आहेत?
| Updated on: Sep 26, 2026 | 2:48 PM
Share

Pitru Dosha: यंदा 26 सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे. तर दहा ऑक्टोबर रोजी पितृपक्षाची सांगता होणार आहे. हिंदू धर्मात पूर्वजांना खूप महत्त्व दिलं जातं. घरात त्यांच्यासाठी विशेष स्थान ठेवण्यापासून ते पितृपक्षात त्यांच्यासाठी श्राद्ध आणि तर्पण करण्यापर्यंत, या सर्वांना विशेष महत्त्व दिलं जातं. अनेकदा, लोकांकडून नकळतपणे अशा काही चुका होतात, ज्यामुळे पूर्वज संतप्त होतात. या चुकांमुळे ती व्यक्ती पितृदोषाची बळी ठरते. जेव्हा पितृदोष होतो किंवा पूर्वज संतप्त होतात, तेव्हा घरात काही चिन्हे दिसू लागतात, ज्याकडे लोक सहसा दुर्लक्ष करतात. तर की लक्षणं कोणती आहेत, ते जाणून घ्या…

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील पूर्वजांच्या असहकार, असमाधान किंवा वाईट कर्मांचा नकारात्मक प्रभाव त्याच्या ग्रहस्थितीवर पडतो, तेव्हा पितृदोष निर्माण होतो. विशेषतः, सूर्य आणि राहूची युती या संदर्भात पाहिली जाते. जेव्हा पूर्वज क्रोधित असतात, तेव्हा पितृदोष उद्भवू शकतो, ज्यामुळे घरात अनेक प्रमुख अशुभ संकेत भासतात असं मानलं जातं.

पूर्वज रागावल्याची चिन्हे कोणती आहेत?

धार्मिक मान्यतेनुसार, जर एखाद्याचे पूर्वज नाराज असतील तर त्याला जीवनात विविध संकटांना सामोरे जावं लागू शकतं.

प्रत्येक कामातील अडथळे येतील. लाखो प्रयत्न आणि कठोर परिश्रम करूनही, जर तुम्ही करत असलेले काम बिघडू लागले आणि तुम्हाला यश मिळत नसेल.

आकस्मिक आर्थिक संकट भेडसावण्याची शक्यता नाकारता येत नाही. व्यवसायात सतत होणारे नुकसान, पैशांचे अचानक नुकसान किंवा सततचे कर्ज होऊ शकतं.

कौटुंबिक वाद होऊ शकतात. घरात पती-पत्नी किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये विनाकारण सततचा तणाव आणि भांडणं होऊ शकतात.

संततीशी संबंधित समस्या येऊ शकतता. वंश पुढे चालवण्यात अडथळे किंवा संततीचे वारंवार खराब आरोग्याबद्दल चिंता सतावेल…

स्वप्नात पूर्वजांचं दर्शन होऊ शकतं. स्वप्नात मृत कुटुंबातील सदस्यांना वारंवार रडताना किंवा रागावलेलं पाहणं, किंवा स्वतःला कोणत्यातरी संकटात पाहणे.

शुभ कार्यांमधील अडथळे येत असतील तर दुर्लक्ष करु नका. घरी लग्न, साखरपुडा किंवा इतर कोणताही शुभ प्रसंग ठरलेला असताना वारंवार अडथळे येतात.

आकस्मिक मोठं संकट समोर येऊ शकतं. एखाद्या व्यक्तीचं उच्च पदावरून अचानक पतन होणं आणि समाजात त्या व्यक्तीचा आदर व सन्मान नाहिसा होऊ शकतो.

पूर्वजांच्या अपराधीपणाच्या भावनेतून मुक्त होण्याचे उपाय

पूर्वजांना नैवेद्य अर्पण करा. पितृपक्ष किंवा अमावस्येच्या दिवशी पूर्वजांना नैवेद्य अर्पण करणं…उत्तम पर्याय आहे. नैवेद्य दाखवणं आणि ब्राह्मणांच्या मेजवान्या आयोजित कराव्यात. दुसरा उपाय म्हणजे, दुपारी पिंपळाच्या झाडाखाली पाणी अर्पण करा आणि दिवा लावा. गरीब, गरजू आणि अनाथांना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान करा. ॐ पित्रभो नमहृ या महामृत्युंजय या मंत्राचा नियमित जप करा.

(डिस्क्लेमर: सदर बातमीतील माहिती ज्योतिषशास्त्रीय गृहीतकांवर आधारित आहे. आम्ही यातील दाव्यांची पुष्टी करत नाही किंवा कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही.)

Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन