Maharashtra tourism : महाराष्ट्रातील या गावात घरांना लावले जात नाही कुलूप; काय आहे यामागचं कारणं? जाणून घ्या
अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे गाव शनिदेवाच्या मंदिरासोबतच घरांना पारंपरिक पद्धतीने दरवाजे आणि कुलूप न लावण्याच्या श्रद्धेसाठी प्रसिद्ध आहे. स्थानिकांचा विश्वास आहे की शनिदेव गावाचे रक्षण करतात.

महाराष्ट्रात एक असं गाव आहे, जिथे अनेक घरांच्या दारांना आजही कुलूप दिसत नाही. घर असो, दुकान असो येथे कुलूप न लावण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे. यामागे आहे गावाची एका देवतेवरची श्रद्धा आणि मान्यता
कुलूप नसलेलं गावं अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर हे गाव आपल्या अनोख्या परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. गावातील अनेक घरांना पूर्वी दारं आणि कुलूप लावण्याची पद्धत नव्हती. त्यामुळे कुलूप नसलेले गाव अशी त्याची ओळख झाली.
घरांना कुलूप का लावत नाही स्थानिक श्रद्धेनुसार शनी देव गावाचं रक्षण करतात आणि त्यांच्या उपस्थितीत चोरी करण्याची हिंमत कोणी करत नाही. अशी मान्यता आहे. त्यामुळे गावकरी घराला कुलूप लावत नाही.
शनिदेवांच्या स्वयंभू मूर्तिची कथा शनी शिंगणापूरमधील शनिदेवांची मूर्ती ही उघड्या जागेत असलेली स्वयंभू मूर्ती असल्याची श्रद्धा आहे. या मूर्ती गावाचे रक्षण करते आणि चोरांना शिक्षा देते. त्यामुळे येथील लोक देवाच्या विश्वासावर निश्चिंत असतात.
घरांना दारंही सर्वांपेक्षा वेगळी आहेत या गावातील घरांची रचना देखील वेगळी आहे.अनेक घरांच्या प्रवेशद्वारांवर नेहमीच्या पद्धतीची दारं किवा कूलूप नाही आहेत .त्यामुळे ही गोष्ट येथील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
चोरी झाली तर शनिदेव शिक्षा करतात स्थानिक मान्यतेनुसार, गावात चोरी करणाऱ्या व्यक्तीला शनिदेवांच्या कोपाला सामोरं जाव लागतं, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे इथे कोणीही चोर चोरी करत नाही
शनी शिंगणापूरची खास ओळख मंदिर, शनिदेवांवरील श्रद्धा आणि कुलूप न लावण्याची परंपरा यामुळे शनी शिंगणापूर महाराष्ट्रातील एक वेगळं धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळखलं जातं.