करवा चौथला ‘या’ 4 राशींची होणार चांदीच चांदी! बुध, शुक्रासह 5 ग्रहांची वक्री चाल ठरणार लाभदायक

करवा चौथच्या दिवशी बुध, शुक्रासह 5 ग्रहांच्या वक्री चालीचा काही राशींवर शुभ प्रभाव पडू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहस्थितीमुळे 4 राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्यासोबतच नशिबाची साथ मिळू शकते. जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी.

करवा चौथला या 4 राशींची होणार चांदीच चांदी! बुध, शुक्रासह 5 ग्रहांची वक्री चाल ठरणार लाभदायक
karwa chauth
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Oct 28, 2026 | 8:25 PM

यंदा गुरुवार, 29 ऑक्टोबर 2026 रोजी करवा चौथचे व्रत पाळले जाणार आहे. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी उपवास करतात. यंदा करवा चौथच्या दिवशी ज्योतिषशास्त्रानुसार विशेष ग्रहयोग तयार होत आहे. या दिवशी शनी, बुध, शुक्र, राहू आणि केतू हे पाच ग्रह वक्री अवस्थेत असल्याचे सांगितले जात आहे. बुध आणि शुक्र तूळ राशीत, शनी मीन राशीत, केतू सिंह राशीत तर राहू कुंभ राशीत स्थित आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहांच्या वक्री चालीचा प्रभाव सर्व १२ राशींवर दिसून येऊ शकतो. मात्र, काही राशींच्या व्यक्तींसाठी ही ग्रहस्थिती विशेष लाभदायक ठरू शकते. या काळात ४ राशींच्या व्यक्तींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि वैवाहिक जीवनात आनंद मिळू शकते. जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यवान राशी कोणत्या आहेत.

कर्क रास
या दिवशी आर्थिक बाबतीत लाभ होईल. काही व्यक्तींवरील जबाबदाऱ्या वाढू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे कार्यालयात कौतुक होऊ शकते. तसेच जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहिल.
वृश्चिक रास
या दिवशी आत्मविश्वास वाढू शकतो. प्रेमसंबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते. जोडीदारासोबतचे नाते अधिक चांगले होतील. आर्थिक परिस्थितीत सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. पैशांशी संबंधित बाबतीत दिलासा मिळू शकतो.
धनु रास
या दिवशी तुमचा वेळ चांगला जाईल आणि मन प्रसन्न राहील. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहिल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पैशांची आवक वाढू शकते. त्यामुळे धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस विशेष ठरू शकतो.
मीन रास
या दिवशी एखादी चांगली ऑफर किंवा नवीन संधी मिळू शकते. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. धन वृद्धीचे योग असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. तसेच प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढू शकतो. जोडीदारासोबतच्या नात्यात प्रेम आणि आनंद वाढू शकते.

Loading...

(डिस्क्लेमर: सदर लेखातील माहिती केवळ ज्योतिषशास्त्रीय गृहीतके आणि उपलब्ध माहितीवर आधारित आहे. आम्ही यातील तथ्यांची किंवा दाव्यांची पुष्टी करत नाही. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे हा आमचा हेतू नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us