AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

यावर्षी हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

यावर्षी हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी आले आहेत. यापूर्वी सन २०००, २००६ आणि २००९ मध्ये हरतालिका आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी आले होते. यानंतर सन २०३२ मध्येही असाच योग येणार आहे.

यावर्षी हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त
Ganesh ChaturthiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 10, 2026 | 9:32 PM
Share

यावर्षी सोमवार १४ सप्टेंबर रोजी श्रीगणपती बाप्पांचे आगमन होतं आहे. सोमवारी १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी भाद्रपद शुक्ल तृतीया संपते आणि भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुरू होते. सूर्योदयी भाद्रपद शुक्ल तृतीया असल्याने हरतालिका पूजन देखील त्या दिवशी करावयाचे आहे आणि मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्यामुळे श्रीगणेशमूर्ती स्थापना आणि पूजन त्याच दिवशी करावयाचे आहे. त्यामुळे यावर्षी हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी एकाच दिवशी आले आहेत. यापूर्वी सन २०००, २००६ आणि २००९ मध्ये हरतालिका आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी आले होते. यानंतर सन २०३२ मध्येही असाच योग येणार आहे असे पंचांग कर्ते खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

याविषयी अधिक माहिती देताना श्री.सोमण म्हणाले हरतालिका आणि श्रीगणेश चतुर्थी ही दोन्ही व्रते भिन्न असल्याने कोणतीही पूजा अगोदर किंवा नंतर केली तरी चालेल. सोमवारी सकाळी ७ वाजून ६ मिनिटांनी भाद्रपद शुक्ल तृतीया संपत असली तरी त्या दिवशी हरतालिका पूजा सूर्योदयापासून मध्यान्हकालापर्यंत म्हणजे दुपारी १-४८ पर्यंत केली तरी चालेल. हरतालिकेचा उपवास मंगळवारी १५ सप्टेंबर रोजी सोडावयाचा आहे. जर कोणी ऋषिपंचमीचा उपवास करीत असेल तर अन्नाचा वास घेऊन उपवास सोडता येतो आणि ऋषिपंचमीचा उपवास चालू ठेवता येऊ शकेल.

सोमवार १४ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यान्हकाली भाद्रपद शुक्ल चतुर्थी असल्याने त्याच दिवशी श्रीगणेश चतुर्थी आहे. श्रीगणेशमूर्ती स्थापना आणि श्रीगणेश पूजन सकाळी ११-२१ ते दुपारी १-४८ या मध्यान्हकाळी करावयाचे आहे. जर ही वेळ शक्य नसेल तर पहाटे उष:कालापासून दुपारी मध्यान्हकाल संपपर्यंत म्हणजे दुपारी १-४८ पर्यंत श्रीगणेशमूर्ती स्थापना आणि गणेश षोडशोपचार पूजन करावयाचे आहे असेही श्री.दा.कृ.सोमण यांनी सांगितले.  यापूर्वी सन २०००, २००६ आणि २००९ मध्ये हरतालिका आणि श्री गणेश चतुर्थी एकाच दिवशी आले होते. यानंतर सन २०३२ मध्येही असाच योग येणार आहे असंही यावेळी दा.कृ.सोमण यांनी सांगितले.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...