AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : खिशात पैसा टिकत नाही? मग दिवाळीपूर्वी करा हे सोपे उपाय, आयुष्यात पैशांची कमी पडणार नाही

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण असतो. या दिवशी लक्ष्मीपूजन देखील केले जाते. लक्ष्मी ही धनाची देवता आहे. दिवाळी सणाला आनंद, समृद्धी आणि प्रकाशाचं प्रतिक मानलं जातं. जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये दिवाळी पूर्वी करण्याचे काही खास उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Shastra : खिशात पैसा टिकत नाही? मग दिवाळीपूर्वी करा हे सोपे उपाय, आयुष्यात पैशांची कमी पडणार नाही
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 17, 2026 | 9:58 PM
Share

दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळीला यश, सुख, समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आहे. या काळात जीवनातील सर्व अंधकार दूर होतो, असं मानलं जातं. दिवाळीला लक्ष्मी पूजन केलं जातं. लक्ष्मी देवीला धनाची देवता माण्यात आलं आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी घरामध्ये लक्ष्मी मातेचं विधिवत पूजन केलं जातं. यामुळे तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो. तुमच्या घरातील पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतात, असं मानलं जातं. तुम्ही लक्ष्मी पूजनावेळी लक्ष्मी मातेला जे गोमती चक्र तसेच कवड्या अर्पण करतात. पूजेनंतर ते गोमती चक्र आणि कवड्या एका लाल कापडामध्ये गुंडाळून त्याची पोटली तुमच्या तिजोरीत ठेवावी. यामुळे घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होऊन, पैसा तुमच्या घरात कायम टिकून राहील. तिजोरी सदैव धनाने भरलेली राहील. दरम्यान दिवाळी पूर्वी देखील करायचे असे काही उपाय वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होतील, आज आपण अशाच काही उपायांबद्दल जाणून घेणार आहोत.

घराची स्वच्छता – वास्तुशास्त्रामध्ये घराच्या स्वच्छतेला सर्वात जास्त महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार जे घर स्वच्छ असतं, अशा घरावर नेहमी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो. त्यामुळे प्रत्येकाने आपलं घर हे स्वच्छ ठेवलंच पाहिजे. विशेषत: दिवाळी पूर्वी संपूर्ण घराची स्वच्छता करावी, कुठेही कचरा असता कामा नये. जर घरात कुठेही जाळे झाले असतील तर ते देखील काढून टाकावेत. घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

घरातील खराब झालेल्या वस्तू फेकून द्या -वास्तुशास्त्रानुसार घरात कधीही खराब झालेल्या वस्तू जसं की खराब फॅन, टिव्ही, बॅटरी अशा जुन्या वस्तू असू नयेत. तसेच घरात बंद घड्याळ देखील असू नये. त्यामुळे या वस्तू दिवाळीपूर्वीच घराबाहेर काढा. अशा वस्तूंमुळे घरात वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट