Vastu Shastra : घरात पैसा टिकत नाही? कर्ज वाढलंय? मग वास्तुशास्त्रामधील हा उपाय कराच
कधी-कधी एखाद्या व्यक्तीवर कर्ज होतं, तो आपल्यावरील कर्ज फेडण्याचा खूप प्रयत्न करतो. मात्र हे कर्ज फिटतच नाही, कर्ज कमी होण्याऐवजी वाढतच जातं. अशा परिस्थितीमधून बाहेर येण्यासाठी वास्तुशास्त्रात काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील एका उपायाबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

कधी-कधी एखाद्या व्यक्तीवर अशी परिस्थिती येते की, त्याने आपल्या एखाद्या आर्थिक गरजेसाठी कर्ज घेतलेलं असतं, त्यानंतर तो हे कर्ज फेडण्याचा खूप प्रयत्न करतो. मात्र त्या व्यक्तीचं कर्ज काही कमी होत नाही. उलट त्यानंतर अशा काही परिस्थिती किंवा अडीअडणी निर्माण होतात की हे कर्ज कमी होण्याऐवजी वाढतच जातं. प्रत्येक व्यक्तीची अशी इच्छा असते, की आपल्याला आपल्या कुटुंबाला सर्व सुख सुविधा मिळाव्यात, आनंदात आयुष्य जगता यावं आणि गाठीशी पुरेसा पैसा असावा. यासाठी अनेकजण आयुष्यात प्रचंड कष्ट करतात, परंतु त्यांच्या हातात शेवटपर्यंत काही पैसा टिकत नाही. पैसा खर्च होत राहतो, त्यामुळे शेवटी काहीही उरत नाही. तर अशी परिस्थिती का निर्माण होते? त्याचं मुख्य कारण म्हणजे तुमच्या घरात निर्माण झालेल्या वास्तुदोषामुळे तुमच्यावर अशी परिस्थिती येऊ शकते. तसेच जर तुमच्या कुंडलीमध्ये राहु ग्रह कमजोर असेल तर त्याचा परिणाम म्हणून तुमच्यावरील कर्ज वाढतच जातं. आज आपण यावर काही उपाय जाणून घेणार आहोत.
घराची पश्चिम दिशा – जर समजा तुमच्यावर खूप कर्ज झालं आहे, तुम्ही ते फेडण्याचा प्रयत्न करत आहात, परंतु ते कर्ज फिटतच नाहीये. तसेच तुम्हाला कायम आर्थिक समस्या जणवतात, हातात पैसा टिकत नाही, अशा परिस्थितीमध्ये माणूस निराश होण्याची शक्यता असते. यासाठी वास्तुशास्त्रामध्ये एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तो म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या पश्चिम दिशेला चलनी नोटा एक डब्यामध्ये बंद करून ठेवाव्यात. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आपण पश्चिम दिशेला जे काही ठेवतो, ते नेहमी आपल्याला दुप्पट मिळतं असं म्हटलं जातं.
त्यामुळेच घराची पश्चिम दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवली जाते, घराच्या या दिशेला कधीही भंगार सामान किंवा इतर गरजेच्या नसलेल्या वस्तू ठेवू नयेत असं वास्तुशास्त्र सांगतं. मात्र तुम्ही जर पैसे एका डब्यामध्ये बंद करून या दिशेला ठेवले तर तुमच्या प्रगतीचे दरवाजे खुले होतात. अकस्मात धन लाभाचा योग मिळतो, व्यावसाय आणि नोकरीमध्ये देखील तुम्हाला चांगल्या संधी प्राप्त होतात. असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे, तसेच तुमच्यावरील कर्ज देखील कमी होतं. दरम्यान जर तुमच्या कुंडलीमधील राहु ग्रह कमजोर असेल तर त्याला प्रबळ करण्यासाठी घराबाहेर पक्ष्यांसाठी दाणे आणि पाण्याची सोय करावी, यामुळे तुमच्या सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या नष्ट होतात असं देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)