AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय

तुम्हालाही तुमच्या आयुष्यात कधी-कधी हा अनुभव आला असेल, जेव्हा तुम्ही घरी येतात तेव्हा तुम्हाला प्रचंड थकवा जाणवतो, कुठल्याही कामात मन लागत नाही, सारखं झोपून राहवं वाटतं. या गोष्टी जर तुमच्यासोबत घडत असतील तर याचाच अर्थ असा की तुमच्या आसपास नकारात्मक ऊर्जा आहे.

Vastu Shastra : घरात आल्यानंतर अस्वस्थ वाटतं? कामात लक्ष लागत नाही? मग करा हा सोपा उपाय
VASTUSHTRAImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Apr 03, 2026 | 8:06 PM
Share

अनेकदा आपल्यासोबत असं घडतं की जेव्हा आपण कामावरून घरी येतो, तेव्हा आपल्याला प्रचंड थकल्यासारखं वाटतं, आपलं कोणत्याही कामात मन लागत नाही. सारखं झोपून रहावं वाटतं. एवढंच नाही तर आपली भूक देखील मंदावते. तुम्ही कधी हा विचार केला आहे का? की आपल्यासोबत हे नेमकं कशामुळे होत असेल? या मागे नक्की काय कारणं असू शकतात? वास्तुशास्त्रानुसार जेव्हा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, तेव्हा त्याचा परिणाम म्हणून तुमच्यासोबत अशा गोष्टी घडू शकतात. जेव्हा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते, त्याचा परिणाम हा केवळ तुमच्या एकट्यावरच होत नाही, तर त्याचा परिणाम हा घरातील प्रत्येक सदस्यांवर होत असतो. यालाच आपण वास्तुदोष असं म्हणतो. जेव्हा घरात वास्तुदोष तयार होतो, तेव्हा अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येणं, किंवा काहीही कारण नसताना घरात सतत भांडणं होणं, या प्रकारच्या समस्या जाणू शकतात. चला तर मग आज आपण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचे काही सोपे उपाय जाणून घेऊयात.

जेव्हा तुम्हाला घरात आल्यानंतर अस्वस्थ जाणवतं, तुमची सारखी चिडचिड होते, त्यावेळी घरात ऊर्जा संतुलन ठेवणं महत्त्वाचं असतं. जेव्हा तुमच्या घरातील ऊर्जा संतुलित असते, तेव्हा अशा प्रकारच्या समस्या जाणवत नाहीत. घरात कुठल्याही प्रकारच्या नकारात्मक शक्तीने प्रवेश करू नये, यासाठी वास्तुशास्त्रात एक सोपा उपाय सांगण्यात आला आहे. तो म्हणजे तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाला कडू लिंबांचे पान बांधून ठेवू शकतात. यामुळे तुमच्या घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही, आणि घरात ऊर्जा संतुलन टिकून राहतं.

वास्तुशास्त्रानुसार तुमच्या बेडरूममध्ये जी ऊर्जा असेल सकारात्मक किंवा नकारात्मक त्याचा सर्वात जास्त परिणाम हा तुमच्यावर होत असतो, कारण तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये रिलॅक्स मोडमध्ये असतात. त्यामुळे बेडरूममध्ये नकारात्मक ऊर्जा येऊ नये यासाठी तुम्ही बेडरूमच्या खिडक्यांना देखील कडू लिंबाचे पान बांधू शकता. त्यामुळे सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतील, परिणामी तुमच्या घरात सकारात्मक वातावरण राहील. घरात वास्तुदोष निर्माण होणार नाही, तुमची सर्व प्रकारच्या समस्यांपासून सुटका होईल असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा