राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या! विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात मुख्यमंत्र्यांसह…
राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध भेटीगाठींमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती.
राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून विविध भेटीगाठींमुळे नव्या चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांची बैठक झाल्याने चर्चांना आणखी बळ मिळाले. या घडामोडींची चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचीही बैठक पार पडली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात चारही नेते एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.
मात्र, या बैठकीचे नेमके कारण काय होते, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
Published on: Jul 09, 2026 04:41 PM
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलना
एकनाथ शिंदेंच्या नाराजीनंतर हालचालींना वेग, नंदनवनवरील बैठकीत...

