AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे... जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान

दीड किलोमीटरमध्ये 8 हजार लोकांची गर्दी म्हणजे… जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत अमित शहांचं मोठं विधान

| Updated on: Oct 14, 2026 | 9:40 AM
Share

राहुल गांधींनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनं सुरूच ठेवण्याचा निर्धार केला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत पुढील रणनीती ठरली असून, नवरात्रोत्सवानंतर मोठं आंदोलन होणार आहे. राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टाचा आदर व्यक्त करत राजकीय प्रतिकार सुरूच राहील असे म्हटले. दुसरीकडे, अमित शाहांनी काँग्रेसच्या नकारात्मक राजकारणावर टीका करत २०२९ मध्येही भाजप सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला.

ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील आंदोलनं सुरूच ठेवण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी केला आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत पुढील रणनीतीवर चर्चा झाली असून, नवरात्रोत्सवानंतर इंडिया आघाडीचे मोठे आंदोलन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधींनी लोकशाही मूल्यांसाठी हा राजकीय प्रतिकार सुरूच ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी नमूद केले की, ही “परसिस्टंट” टीम थांबणार नाही.

आज नाही तर उद्या, पण अंतिम ध्येयापर्यंत ती पोहोचेल. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्ट आणि न्यायव्यवस्थेचा आम्ही आदर करतो, परंतु राजकीय आणि लोकांचा प्रतिकार सुरूच राहील आणि तो यशस्वी होईल. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर पलटवार केला. शाह म्हणाले की, काँग्रेस ज्या प्रकारचं नकारात्मक राजकारण करत आहे, त्याचा त्यांना फायदा होणार नाही. २०२९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीए प्रचंड बहुमताने पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, काँग्रेसचा पराभव २००४ पासूनच होत असल्याचा उल्लेखही शाह यांनी केला. इतकेच नाही तर ते म्हणाले कोट्यावधी जनतेचा पाठिंबा आमच्यासोबत आहे. जंतर-मंतरच्या दीड किलोमीटरवर आठ हजार लोकांची गर्दी म्हणजे काही पूर्ण देशाचा आवाज नाही. अनेकांची वेगवेगळी मतं आहेत.

Published on: Oct 14, 2026 09:40 AM

Follow Us