AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छातीभर पुराच्या पाण्यात थरार… घराच्या दरवाज्यावरून गरोदर महिलेला प्रसुतीसाठी नेले, समाजसेवक बनले देवदूत

Pregnant Woman Rescued : पालघरमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असताना माणुसकीचा एक हृदयस्पर्शी प्रत्यय पाहायला मिळाला. छातीभर पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका गरोदर मातेला वाचवण्यासाठी चक्क घराचा दरवाजा स्ट्रेचर बनवण्यात आला.

छातीभर पुराच्या पाण्यात थरार... घराच्या दरवाज्यावरून गरोदर महिलेला प्रसुतीसाठी नेले, समाजसेवक बनले देवदूत
palghar flood pregnant woman rescuedImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 09, 2026 | 6:18 PM
Share

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पावसाने कहर केला. अनेक भागात पाणी साचल्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागला. अशातच आता पालघरमध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असताना माणुसकीचा एक हृदयस्पर्शी प्रत्यय पाहायला मिळाला. छातीभर पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका गरोदर मातेला वाचवण्यासाठी चक्क घराचा दरवाजा स्ट्रेचर बनवण्यात आला. जीवाची पर्वा न करता काही देवदूतांनी पूर ओलांडत महिलेला रुग्णालयात पोहोचवलं आणि अखेर तिच्या कुशीत गोंडस बाळाचं आगमन झालं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गरोदर महिलेला अचानक प्रसूती कळा

पालघर जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. पालघर तालुक्यातील केळवे रोड भागात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल होती. हनुमानपाडा परिसरात गरोदर महिला प्रियांका यादव यांना अचानक प्रसूती कळा सुरू झाल्या. मात्र त्याचवेळी परिसरात मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी साचले होते. रस्ते पाण्याखाली गेल्याने रुग्णालयापर्यंत पोहोचण्याचा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे आता दवाखान्यात कसं जायचं हा प्रश्न समोर होता.

घराचा दरवाजा बनला स्ट्रेचर…

आणीबाणीची परिस्थिती लक्षात घेऊन आशा सेविका दिव्या घरत, समाजसेवक चेतन गावड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. वाहन जाण्याची शक्यता नसल्याने त्यांनी एका घराचा दरवाजा काढून त्याचा स्ट्रेचर म्हणून वापर केला. त्या दरवाजावर प्रियांका यांना झोपवून छातीभर पाण्यातून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. पूराच्या पाण्याचा धोका पत्करत या मदतकर्त्यांनी प्रियांका यादव यांना सफाळे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. वेळेत उपचार मिळाल्याने रुग्णालयात त्यांची सुखरूप प्रसूती झाली आणि त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला.

चेतन गावड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक

समोर आलेल्या माहितीनुसार, सध्या माता आणि बाळ दोघांचीही प्रकृती ठणठणीत असून, दोन जीव वाचवण्यासाठी धाडस दाखवणाऱ्या चेतन गावड आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. संकटाच्या काळात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा हा प्रत्यय देणारा प्रसंग ठरला आहे.

Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?