AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यांच्याकडे 2000 ची नोट त्यांना लागणार मोठी लॉटरी; होणार मालामाल, आरबीआयची सर्वात मोठी घोषणा

नोटी बंदीची घोषणा केल्यानंतर जुन्या 500 आणि 1 हजार रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या, त्यानंतर दोन हजार रुपयांची नोट चलनात आली. परंतु त्यानंतर दोन हजार रुपयांची नोट बनवणं देखील बंद करण्यात आलं, आता या नोटीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

ज्यांच्याकडे 2000 ची नोट त्यांना लागणार मोठी लॉटरी; होणार मालामाल, आरबीआयची सर्वात मोठी घोषणा
2,000 noteImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 09, 2026 | 6:33 PM
Share

2016 मध्ये देशात नोटबंदीची घोषणा करण्यात आली होती. या नोटबंदी अंतर्गत देशात जेवढ्या काही जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा होत्या, त्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मार्केटमध्ये 100, 200, 500 आणि 2000 हजार रुपयांच्या चलनी नोटा आणण्यात आल्या. त्यामध्ये सध्या मार्केटमध्ये 100, 200 आणि 500 रुपयांच्या नोटा अजूनही सुरू आहेत, परंतु सरकारने दोन हजार रुपयांची नोट तयार करणं बंद केलं आहे, एवढंच नाही तर बाजारातून देखील सर्व दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्यात आल्या आहेत. मात्र काही लोकांकडे अजूनही दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत. या नोटांचं काय करावं? हे त्यांना कळत नाहीये, अशा लोकांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे.

नोटबंदीची घोषणा केल्यानंतर चलनाचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी सरकारने मार्केटमध्ये दोन हजार रुपयांची नोट आणली होती. मात्र त्यानंतर काही दिवसांनी सरकारने या नोटीची छपाई बंद केली. तसेच मार्केटमधून देखील या नोटा पुन्हा वापस मागवण्यात आल्या आहेत. मात्र अजूनही अनेकांच्या तिजोरीमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा शिल्लक आहेत, आता या नोटांचं काय करायचं? असा प्रश्न त्यांना पडला आहे. कारण मार्केटमध्ये आता दोन हजार रुपयांची नोट कोणीही घेणार नाही. त्यामुळे आता या नोटा अशाच तिजोरीमध्ये पडून राहणार का? अशी भीती अनेकांच्या मनात आहे.

आता या नोटांबाबत आरबीआयकडून मोठी अपडेट आली आहे, आरबीआयाने ट्वि्ट करत याबाबत माहिती दिली आहे. जर तुमच्याकडे अजूनही दोन हजार रुपयांच्या नोटा असतील तर घाबरून जाऊ नका, त्या नोटा तुम्ही अजूनही बदलू शकतात. त्यासाठी तुम्ही आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या 19 इश्यू ऑफिसपैकी कोणत्याही एका ऑफिसमध्ये जाऊन ही नोट बदलून घेऊ शकतात. जर समजा तुम्ही तिथे येऊ शकत नसाल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इंडिया पोस्टच्या माध्यमातून ही नोट आरबीआयच्या 19 इश्यू ऑफिसपैकी कोणत्याही एका ऑफिसला ही नोट पाठवून तुमच्या बँक खात्यात त्या नोटेच्या बदल्यात रक्कम जमा करू शकतात, असं आरबीआयने म्हटलं आहे, एवढंच नाही तर तुम्ही या संदर्भातील अधिक माहिती आरबीआयच्या वेबसाईटवरून देखील घेऊ शकता, असंही या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा