AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित पवारांना पहिला मोठा धक्का? राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीतून सर्वात मोठी बातमी

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. रोहित पवार हे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. परंतु त्यापूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटातून एक मोठी बातमी समोर आली आहे.

रोहित पवारांना पहिला मोठा धक्का? राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बैठकीतून सर्वात मोठी बातमी
Rohit PawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 26, 2026 | 6:14 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न घेऊन रोहित पवार हे हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार यांच्या या मोर्चाला त्यांच्याच पक्षाचा पाठिंबा नसल्याची चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी रोहित पवार यांची एक महत्त्वाची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आपल्या या आंदोलनाला पक्षाचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटातील सर्व बडे नेते या मोर्चात सहभागी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता. परंतु आता एक मोठी बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे आज राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात सर्व जिल्हा प्रमुखांची बैठक पार पडली आहे. परंतु सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून रोहित पवार यांच्या मोर्च्यात सहभागी व्हावे यासाठी जिल्हा प्रमुखांना कोणत्याही थेट सूचना देण्यात आलेल्या नाहीत. हा रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

आज पार पडलेल्या बैठकीमध्ये नागपूर अधिवेशनादरम्यान रोहित पवार हे काढणारा असलेल्या मोर्चामध्ये सहभागी व्हावे की नाही याविषयी कोणत्याही थेट सूचना करण्यात आल्या नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार या बैठकीमध्ये दुष्काळावर चर्चा झाली. राज्यात सर्वत्र दुष्काळ आहे, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सज्ज राहावं. दुष्काळाच्या मुद्द्यावर काम करत असताना सरकारविरोधात आक्रमक भूमिका घ्यावी. सरकारच्या योजनांची अंमलबजावणी होते की नाही? यावर लक्ष ठेवावं. स्थानिक पातळींवर प्रशासनावर दबाव ठेवत जनतेच्या हिताचा विचार करावा, अशा सूचना या बैठकीमध्ये देण्यात आल्या आहेत.

Follow Us
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे...
सुनेत्रा पवारांचा राष्ट्रवादीच्या सर्व मंत्र्यांना तातडीने बैठकीचे आदेश, देवगिरी बंगल्यावर मोठ्या घडामोडी!
ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध...
Thane : ठाणे महापालिकेला धमकीचा ई-मेल; कर्मचारी आणि नागरिक सावध
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही..
मोठी बातमी! तामिळनाडू सरकारचा ऐतिहासिक निर्णय; पुरुष कर्मचाऱ्यांनाही मिळणार पितृत्व रजा
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली...
संविधान दिनी नागपूर-मुंबईत आंदोलन! CJP-काँग्रेसची संविधान बचाव रॅली, भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट
पुणे पाठोपाठ नाशिक जिल्हा न्यायालयालाही धमकीचा मेल; सहावा मजला टार्गेट, पोलीस यंत्रणा सतर्क!
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर
अंबडमध्ये पोलिसांचा मोठा दणका! गुन्हेगारांनी हडपलेल्या जमिनीवरील शेडवर बुलडोझर
दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
Rohit Pawar : अजित दादांसारखा वचकच नाही! रोहित पवारांचा पुण्याच्या पालकमंत्र्यांना टोला
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात..
शरद पवार रुग्णालयात दाखल, प्रफुल्ल पटेलांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत बैठक
जपानचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईत दाखल; राहुल नार्वेकरांसोबत महत्त्वपूर्ण चर्चा, कारण काय?
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी
शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात शेतकरी आक्रमक! सलग तिसऱ्या दिवशीही जमीन मोजणी रोखली, पोलिसांशी झटापट