Alandi | पालखी मार्गावर महिलेचा हायव्होल्टेज राडा! आधी रस्त्यावर झोपली, मग थेट बॅरिकेड तोडून गाडी घातली
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी शहरात कडक वाहतूक नियोजन आणि नाकाबंदी करण्यात आली होती. याचदरम्यान पालखी मार्गावर एका महिलेने गोंधळ घातल्याची घटना समोर आली असून, काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदीतील पीसीएस चौकात ड्रायव्हिंग स्कूल चालवणाऱ्या एका महिलेने पोलिसांशी वाद घातला. पालखी मार्ग वाहतुकीसाठी बंद असल्याने पोलिसांनी संबंधित महिलेला पुढे जाण्यास मज्जाव केला. मात्र, “रस्ता खुला केला नाही तर मी रस्ता अडवेन,” असे म्हणत ती महिला थेट रस्त्यावर झोपली.
यानंतरही पोलिसांनी पालखी मार्गावर वाहने सोडता येणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर संतप्त झालेल्या महिलेने तेथील बॅरिकेड हटवत गाडी पुढे नेल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेची आळंदी पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, संबंधित वाहनाची आणि महिलेची माहिती संकलित केली जात आहे. घटनेचा तपास सुरू असून, तपासानंतर संबंधितांवर नियमानुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
Published on: Jul 09, 2026 04:38 PM
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..