Vastu Shastra : करियरमध्ये यश मिळत नाहीये? मग लॅपटॉप शेजारी चुकूनही ठेवू नका या वस्तू
वास्तुशास्त्रानुसार अशा काही वस्तू असतात, ज्या वस्तूंमुळे आपल्या करियरमध्ये बाधा निर्माण होऊ शकते, अनेकदा अडचणी येतात. त्यामुळे अशा वस्तू कधीही आपल्या ऑफिसच्या डेस्कवर किंवा लॅपटॉप शेजारी ठेवल्या नाही पाहिजेत, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

अनेकजण करिअरमध्ये प्रगती व्हावी, चांगली संधी मिळावी यासाठी रात्रंदिवस मेहनत करत असतात. प्रचंड कष्ट करतात. मात्र तरी देखील त्यांना यश मिळत नाही. त्यांच्या करिअरमध्ये सातत्याने अडथळे निर्माण होतात. मोठी संधी मिळत नाही. असं का होत तर त्यामागे विविध कारणं असू शकतात. परंतु वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या रोजच्या आयुष्यात काही गोष्टी या चुकीच्या करत असतात, त्याचा अशुभ प्रभाव हा तुमच्यावर पडतो, त्यामुळे देखील अशा घटना तुमच्यासोबत घडू शकतात. हे सर्व दोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला जर तुमच्या करिअरमध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या रोजच्या कामाच्या जागेत थोडा बदल करू शकता, त्यामुळे निगेटीव्ह ऊर्जा दूर होण्यास मदत होते. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये यश मिळण्याची संधी वाढते, चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगण्यात आलं आहे? त्याबद्दल.
लॅपटॉप शेजारी या गोष्टी ठेवू नका – वास्तुशास्त्रानुसार अनेकदा असं होतं की, तुम्ही तुमच्या करिअरसाठी प्रचंड मेहनत घेतात, परंतु तुम्हाला त्यामध्ये अपेक्षित यश मिळत नाही. अनेकदा संधी हुलकावणी देते. अशा वेळी तुम्ही जिथे काम करतात, किंवा तुमच्या लॅपटॉप शेजारी काही गोष्टी ठेवणं हे आवर्जून टाळलं पाहिजे, कारण अशा गोष्टींचा तुमच्या आयुष्यावर नकारात्म परिणाम होतो, ज्यामुळे तुमची जी अपेक्षा असते, त्या अपेक्षेच्या विपरीत गोष्टी घडतात. करिअरमध्ये अडथळे निर्माण होतात. कामात लक्ष लागत नाही, सारखी चिडचिड होते. त्याचा परिणाम हा तुमच्या कामावर देखील होतो.
वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या लॅपटॉपजवळ कधीही जुने चार्जर, खराब झालेले वायर, खराब झालेला किंवा तुटलेला पेन ड्राईव्ह, सीडी, डिव्हिडी, तसेच अनावश्यक आणि काम नसलेल्या कागदांचा पसारा कधीही ठेवू नये. या सर्व गोष्टींचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होतो. नकारात्मक ऊर्जेमुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होऊन ऊर्जा संतुलन बिघडते. ज्याचा फटका हा तुम्हाला बसतो, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्याच प्रमाणे तुम्ही तुमच्या लॅपटॉपजवळ कधीही धारदार वस्तू देखील ठेवल्या नाही पाहिजे, असंही वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
