AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : रोजच्या आयुष्यातील या चुका पडतील महागात, व्हाल कंगाल, वास्तुशास्त्र काय सांगतं?

आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण अशा काही छोट्या छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास तुमच्या आयुष्यात अडचणी वाढू शकतात. अशा प्रकारे निर्माण होणारा वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

Vastu Shastra : रोजच्या आयुष्यातील या चुका पडतील महागात, व्हाल कंगाल, वास्तुशास्त्र काय सांगतं?
vastushtraImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 16, 2026 | 8:31 PM
Share

वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही छोट्या-छोट्या चुका करत असतो, ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा वाढते. नकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव कमी होतो. घरात नकारात्मक ऊर्जा वाढल्यामुळे ऊर्जा संतुलन बिघडतं. जेव्हा अशा प्रकारे तुमच्या घरातील ऊर्जा संतुलन बिघडतं तेव्हा तुमच्या आयुष्यात विविध अडचणी येऊ शकतात. जसं की तुम्ही कितीही कमावलं तरी तुमच्या हातात पैसा टिकत नाही. कोणत्या न कोणत्या कारणांमुळे तो खर्च होतो. एवढंच नाही तर काही कारण नसताना घरात सारखे भांडणं होतात. पती-पत्नीचं पटत नाही. मुलांच्या अभ्यासामध्ये आणि करिअरमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर करणं गरजेचं असतं. त्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत, त्यातीलच काही उपायांबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अशा काही चुका करत असतो, ज्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.

दिवसा उशिरापर्यंत झोपणं – वास्तुशास्त्रानुसार दिवसा कधीही उशिरापर्यंत झोपू नये, पहाटे लवकर उठावे. कारण जो व्यक्ती सकाळी उशिरापर्यंत झोपतो, त्याच्या अंगात दिवसभर आळस कायम राहतो. तसेच ज्या घरामध्ये लोकं दिवसा उशिरापर्यंत झोपून राहतात, त्या घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव देखील जास्त असतो, त्यामुळे झोपेतून दररोज सकाळी लवकर उठावं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

दुसऱ्याचे कपडे वापरू नका – अनेकांना आपल्या मित्राचे किंवा नातेवाईकांचे कपडे घालण्याची सवय असते. परंतु कधीही दुसऱ्या व्यक्तीचे कपडे घालू नये, यामुळे संबंधित व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे येण्याची शक्यता असते. त्यामुळे इतरांचे कपडे परिधान करण्यास वास्तुशास्त्रामध्ये अशुभ मानलं गेलं आहे.

अंथरुणावर बसून जेवू नका – वास्तुशास्त्रामध्ये अंथरुणावर बसून जेवण करणं हे अशुभ माण्यात आलं आहे. कारण ज्या घरातील लोक हे नेहमी अंथरुणावर बसून किंवा बेडवर बसून जेवणं करतात, अशा घरात कायम पैशांची चणचण असते, त्यामुळे कधीही अंथरुणावर बसून जेवण करू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

नखं कुरतडण्याची सवय – अनेकांना आपली नखं तोंडाने कुरतडण्याची सवय असते, वास्तुशास्त्रानुसार यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या तर निर्माण होतातच , परंतु मोठी धनहानी देखील होते.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?