AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?

Vastu Shastra Tips : अनेकदा लोक वेळ वाचण्यासाठी ऑफिसच्या डेस्कवरच जेवतात. ऑफिस असो वा वर्क फ्रॉम होम अनके लोक लंच ब्रेक घेण्याऐवजी लॅपटॉप समोर बसून भरभर जेवण संपवतात.

Vastu Shastra Tips : ऑफिसमध्ये परफॉर्मन्स सुधारण्यासाठी, नुकसान टाळण्यासाठी वास्तू शास्त्राचे कुठले नियम पाळले पाहिजेत?
vastu shastra tips for officeImage Credit source: unsplash
| Updated on: Apr 02, 2026 | 4:03 PM
Share

वास्तू शास्त्राची आपल्या रोजच्या आयुष्यात खूप महत्वाची भूमिका आहे. घरापासून ऑफिसपर्यंत वास्तूशी संबंधित काही गोष्टी आहेत. या दोन्ही ठिकाणी वास्तू योग्य असणं गरजेच आहे. वर्क आणि पर्सनल लाइफमध्ये चांगला बॅलन्स पाहिजे. म्हणूनच फक्त घरातच वास्तू संबंधित नियमांचं पालन करु नका. ऑफिसमध्ये सुद्धा काही गोष्टी पाळा. ऑफिसमध्ये डेस्क, कुठल्या दिशेला बसून काम करायचं या संदर्भात काही नियम आहेत. त्याचं व्यवस्थित पालन न केल्यास तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं. वास्तूशी संबंधित हे नियम कायम आहेत ते जाणून घ्या.

सामान्यत: लोक ऑफिसमध्ये असताना कॅन्टीन किंवा पॅन्ट्रीमध्ये जाऊन जेवतात. अनेकदा लोक वेळ वाचण्यासाठी ऑफिसच्या डेस्कवरच जेवतात. ऑफिस असो वा वर्क फ्रॉम होम अनके लोक लंच ब्रेक घेण्याऐवजी लॅपटॉप समोर बसून भरभर जेवण संपवतात. अनेकदा कामाचा प्रेशर इतका असतो की, लोक जेवणासाठी सुद्धा वेगळा वेळ काढू शकत नाहीत. वास्तू आणि आरोग्य यांच्या दृष्टीने ही चांगली सवय नाही.

त्यामुळे मन अशांत होईल

वास्तू शास्त्र नियमानुसार ऑफिसच्या डेस्कजवळ बसून खाणं टाळलं पाहिजे. डेस्क जवळ जेवल्यामुळे ऊर्जा प्रभावित होते. डेस्क जवळ जेवल्याने ऊर्जा कमी होते. त्याचा परिणाम तुमच्या परफॉर्मन्सवर होतो. ऑफिस डेस्कवर लॅपटॉप पासून फाईल्सशी संबंधित अनेक गोष्टी असतात. तिथे आधीच जास्त ऊर्जा असते. तिथे जेवण करुन आपण नकारात्मकता वाढवतो. त्यामुळे मन अशांत होईल. कामामध्ये एकाग्रता लागणार नाही. म्हणून ऑफिसमध्ये डेस्कजवळ जेऊ नये.

त्यामुळे परफॉर्मन्स सुधारतो

वास्तूच्या हिशोबाने दिवसात काही वेळ ब्रेक जरुर घेतला पाहिजे. लंच ब्रेकच्यावेळी डेस्कपासून लांबच रहा. त्यामुळे काही वेळासाठी मन शांत होतं. दिवसभरासाठी एनर्जी टिकून राहते. भले एक-दोन मिनिटांचे छोटे-छोटे ब्रेक असतील तर ते जरुर घेतले पाहिजेत. त्यामुळे परफॉर्मन्स सुधारतो. कामात मन लागतं.

ऑफिस डेस्कजवळ कुठलं प्लांट लावायचं?

शास्त्रानुसार ऑफिस डेस्क नेहमी स्वच्छ ठेवलं पाहिजे. इथे अजिबात घाण करु नये. ऑफिस डेस्कजवळ जितक्या आवडीच्या गोष्टी असतील तितकं कामात मन लागेल. त्याशिवाय मनी प्लांट आणि जेट प्लांट ठेवणं चांगलं मानलं जातं.

Follow Us
वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा
मोठी बातमी! वेळेवर मदत मिळाली असती तर... ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नातेवाईकांचा आक्रोश
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण! "काका मला मारू नका, मी...
KDMC डॉक्टरांना मारहाण प्रकरणाला वेगळंच वळण!
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा
मृत्यूचा हाहाकार! 33 भारतीय पर्यटक असलेलं जहाज उलटलं; थरकाप उडवणारा Video समोर
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिय
एकनाथ शिंदेंच्या दालनातील बैठकीपासून तर विलिनीकरणापर्यंत; अखेर सुप्रिया सुळेंनी पक्षातील Inside Story सांगितलीच
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले..
केंद्रात जाणार का? CM फडणवीसांचे मिश्कील विधान तुफान चर्चेत, म्हणाले...
थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
मोठी बातमी! थेट धमकी अन् XXX... आणखी एका खासदाराची खळबळजनक ऑडिओ क्लिप व्हायरल
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा
राज्याच्या तिजोरीवर शेतकऱ्यांचा पहिला अधिकार, लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार; उपमुख्यमंत्री शिंदेंचे विधान
राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
Bachchu Kadu | राऊतांच्या भाकितावर बच्चू कडूंचा टोला; थेट म्हणाले, दिल्लीत...
टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर
Pandharpur Wari | टाळ-मृदंगाच्या गजरात ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवडकडे मार्गस्थ; खडतर दिवेघाट सर करत वारी चालली पंढरी
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं,
पवारांच्या घरी पुन्हा वाजणार सनई-चौघडे, पार्थ पवारांचं लग्न ठरलं, कोण आहे पवार कुटुंबातील होणारी सून?