Vastu Upay: देवासमोर दिवा लावतांना हा उपाय नक्की करा, ‘या’ समस्या कायमच्या संपतील

| Updated on: Jan 14, 2023 | 1:29 PM

कोणतीही पूजा करायची असेल तर त्याची सुरुवात आधी दिवा लावून होते. हिंदू धर्मात शुभ असो वा अशुभ प्रत्येक प्रसंगी आणि प्रत्येक पुजेत दिवा हा लावलाच जातो.

Vastu Upay: देवासमोर दिवा लावतांना हा उपाय नक्की करा, या समस्या कायमच्या संपतील
दिव्याचे महत्व
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई, हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा (Diya Upay) लावण्याचे विशेष महत्त्व आहे. दिवा  केवळ प्रकाश नाही तर सकारात्मकताही देतो. देवाच्या पूजेच्या सुरुवातीला दिवा लावावा असा नियम आहे. कोणतीही पूजा करायची असेल तर त्याची सुरुवात आधी दिवा लावून होते. दिव्यानेच देवाची आरती केली जाते. अनेकजण घरातील देवघरातही अखंड दिवा लावतात. हिंदू धर्मात शुभ असो वा अशुभ प्रत्येक प्रसंगी आणि प्रत्येक पुजेत दिवा हा लावलाच जातो, पण शास्त्रात दिवा लावण्याची विशीष्ट पध्दती सांगण्यात आली आहे. या नियमांचे पालन केल्याने घरातला वास्तूदोष दूर होतो (Vastu Tips). आर्थिक समस्या, काैटुंबीक कलह आणि प्रगतीमधील बाधा दुर होतील.

 

दिव्यामुळे नकारात्मकता दुर होते

घरातील नकारात्मकता दूर सकाळी आणि संध्याकाळी आवर्जूण दिवा लावावा. असे मानले जाते की घरातल्या देवघरासमोर दिवा लावल्याने नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा संचारते. दिवा लावण्याचा अर्थ प्रकाश अंधार दुर करून सकारात्मकतेचा प्रकाश प्रज्वलीत करणे.

हे सुद्धा वाचा

वास्तु दोषांसाठी

असे मानले जाते की प्रत्येक खोलीत तुपाचा दिवा लावल्यास घरातील वास्तुदोष संपून सुख-समृद्धी येते. संध्याकाळी देवघरासमोर तुपाचा दिवा लावल्याने आर्थिक समस्या दूर होतात. संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने घरात कायम लक्ष्मीचा वास राहतो, तसेच आर्थिक समस्या दुर होतात.

पितळीचा दिवा

पूजेसाठी दररोज फक्त पितळेचा दिवा लावावा, तो शुभ मानला जातो. स्टील किंवा इतर कोणत्याही धातूचा दिवा शुभ मानला जात नाही.

पणती

पणती म्हणजेच मातीच्या दिव्यालाही स्वतःचे महत्त्व आहे. दारासमोरील तुळशीसमोर किंवा नदीमध्ये दिपदान करण्यासाठी  मातीचा दिवा म्हणजेच पणती वापरावी. दिवाळीतही आपण मातीचे दिवे वापरतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)