AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ: गुवाहाटीत प्लेइंग ईलेव्हनमधून दोघांचा पत्ता कट! कुणाचं कमबॅक होणार?

India vs New Zealand 3rd T20i Probable Playaing 11 : विजयी संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल न करण्याचा अलिखित नियम आहे. मात्र त्यानंतरही अनेकदा विविध कारणांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल केले जातात.त्यानुसार टीम इंडिया गुवाहाटीत होणाऱ्या तिसऱ्या टी 20i सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करु शकते.

IND vs NZ: गुवाहाटीत प्लेइंग ईलेव्हनमधून दोघांचा पत्ता कट! कुणाचं कमबॅक होणार?
Arshdeep Singh and Harshit Rana Team IndiaImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jan 25, 2026 | 10:58 AM
Share

टीम इंडियाने न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20i मालिकेत सलग 2 सामने जिंकत नववर्षाची जबरदस्त सुरुवात केलीय. भारताने या सलग 2 विजयांसह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे. आता उभयसंघातील तिसरा सामना हा गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना रविवार 25 जानेवारीला होणार आहे. भारताला हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर करण्याची संधी आहे. टीम इंडिया या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता आहे. तिसऱ्या सामन्यासाठी एकूण 2 बदल अपेक्षित आहेत. टीम मॅनेजमेंट नक्की कोणत्या दोघांना प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकते? हे जाणून घेऊयात.

गुवाहाटीत वेगवान गोलंदाज हर्षित राणा याच्यासह प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकूण 2 बदल केले जाऊ शकतात. हर्षितला पहिल्या सामन्यात संधी मिळाली नव्हती. मात्र हर्षितला दुसऱ्या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या जागी संधी देण्यात आली होती. बुमराहला रायपूरमधील सामन्यात विश्रांती देण्यात आल्याने हर्षितचा प्लेइंग ईलेव्हनध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र आता बुमराहचं कमबॅक झाल्यास हर्षितला बाहेर व्हावं लागेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

दुसरा खेळाडू कोण?

भारताने दुसऱ्या सामन्यासाठी 2 बदल केले होते. बुमराह व्यतिरिक्त अक्षर पटेल याला दुखापतीमुळे बाहेर व्हावं लागलं होतं. त्यामुळे अक्षरच्या जागी कुलदीप याचा समावेश करण्यात आला होता. अशात आता अक्षरचा समावेश झाल्यास कुलदीपला बेंचवर बसावं लागू शकतं. मात्र बीसीसीआयकडून अक्षरच्या दुखापतीबाबत कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही. अक्षरला नागपूरमध्ये पहिल्याच सामन्यात बॉलिंग करताना बोटाला दुखापत झाली होती. अक्षरला बॉल अडवताना बोटाला फटका बसला होता. त्यामुळे अक्षरच्या बोटातून रक्त वाहू लागलेलं. त्यामुळे अक्षरला दुसऱ्या सामन्याला मुकावं लागलं.

कुलदीपने रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या टी 20i सामन्यात न्यूझीलंडच्या 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला होता. तर हर्षितने 1 विकेट मिळवली होती. मात्र आता टीम मॅनेजमेंटचा प्लेइंग ईलेव्हनबाबत अंतिम निर्णय काय आहे? हे टॉसनंतर स्पष्ट होईल.

तिसऱ्या टी 20I साठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, शिवम दुबे, अक्षर पटेल/कुलदीप यादव, हर्षित राणा/जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह आणि वरुण चक्रवर्ती.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...