Uddhav Thackeray | मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
'मी नालायक म्हणून जन्माला आलोय हा शिक्का मी माझ्या कपाळावर लागू देणार नाही' असं वक्तव्य करत ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.आम्ही लढतोय आणि लढत राहणार असंही ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांच्या जन्म शताब्दीच्या कार्यक्रमात भाषण करताना शिवसेना उबाठा पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे शिकवलं, जगायचं कसं हेच आपण विसरून गेलो तर गुलामीचे जगणे कदापि शक्य नाही असं ठाकरे म्हणाले. ‘मी मेलो तरी बेहत्तर पण ‘त्या’ दोन व्यापारांचा गुलाम म्हणून मी जगणार नाही’ ही शपथ सगळ्यांनी घेतली पाहिजे, उद्धव ठाकरे यांनी मोदी आणि शहांवर नाव न घेता निशाणा साधला आहे. मी गद्दारांसोबत गेलो तर मला किती कोटी मिळतील? असंही ठाकरे यांनी विचारलं. मी असं केलं तर मला बाळासाहेबांचं नाव घेता येणार नाही असंही ठाकरे म्हणाले, ‘मी नालायक म्हणून जन्माला आलोय हा शिक्का मी माझ्या कपाळावर लागू देणार नाही’ असं वक्तव्य करत ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला आहे.आम्ही लढतोय आणि लढत राहणार असंही ठाकरे म्हणाले.

