BJP | ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
संजय राऊत हे राहुल गांधींचे नवरी झालेत. जे काँग्रेसचे नवरी झालेत त्यांनी इतरांना सून आणि सासू म्हणू नये. संजय राऊत हे 12 जणांचे प्रेयसी आहेत, याचं भान राऊतांनी ठेवावं, असं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांना चांगलंच डिवचलं आहे.
शिवसेना आणि भाजप यांच्यातील गटस्थापना ही ‘घटस्थापनेपर्यंत’ पुढे जाऊ शकते कारण दोन्ही पक्षात अजूनतरी एकी झाल्याचं दिसून येत नाही आहे.असं वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं होतं. शिंदे रुसून बसलेत, रुसलेल्या सुनबाईसारखं दिल्लीला चकरा मारतात, दिल्लीतले सासरे ऐकत नाही म्हणून सुनबाईंची अडचण झाली आहे, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली होती. मुंबईतल्या महापौर पदावरून राऊतांनी शिंदेंवर ही टीका केली.
राऊत यांच्या या टीकेचा भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी समाचार घेतला आहे. संजय राऊत हे राहुल गांधींचे नवरी झालेत. जे काँग्रेसचे नवरी झालेत त्यांनी इतरांना सून आणि सासू म्हणू नये. संजय राऊत हे 12 जणांचे प्रेयसी आहेत, याचं भान राऊतांनी ठेवावं, असं म्हणत नवनाथ बन यांनी राऊतांना चांगलंच डिवचलं आहे.

