AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Sooryavanshi: अरे त्याला काढून टाका संघातून… वैभव सूर्यवंशीबद्दल मोठं विधान, माजी खेळाडू संतापला

Vaibhav Sooryavanshi: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात टी-२० मालिका सुरु होणार आहे. या मालिकेपूर्वी वैभव सूर्यवंशीबद्दल माजी खेळाडूने एक विधान केले आहे.

Vaibhav Sooryavanshi: अरे त्याला काढून टाका संघातून... वैभव सूर्यवंशीबद्दल मोठं विधान, माजी खेळाडू संतापला
| Updated on: Oct 19, 2026 | 3:17 PM
Share

IND vs NZ T20 Series: वेस्ट इंडिजविरुद्धचा अंतिम टी२० सामना पावसामुळे रद्द झाला, परिणामी टी२० मालिका २-२ अशी बरोबरीत सुटली. या मालिकेत वैभव सूर्यवंशीला संधी मिळाली नाही. आता वैभवला न्यूझीलंडविरुद्ध संधी मिळणार की नाही याकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २२ ऑक्टोबर २०२६ मालिका रंगणार आहे. आता या मालिकेपूर्वी वैभव सूर्यवंशीबद्दल एका माजी खेळा़डूने जे विधान केले त्याची चर्चा सुरु आहे.

आकाश चोप्रा काय म्हणाला?

आता याबद्दल माजी सलामीवीर आकाश चोप्राने आता एक वेगळे मत व्यक्त केले आहे, की वैभवला संघातून वगळले पाहिजे. तो म्हणाला की हे दुर्दैवी आहे, पण सध्या दुसरा पर्याय नाही. अशा परिस्थितीत, वैभवला बेंचवर बसवण्याऐवजी, त्याला भारतीय संघातून काढून टाकून सध्या सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीमध्ये खेळवणे हे त्याच्या हिताचे आहे. तिलक वर्माच्या जागी सूर्यवंशीला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान द्यावे का. त्यावर चोप्रा म्हणाला, “वैभव सूर्यवंशीला संधी मिळत नाहीये कारण त्याच्यासाठी संघात जागा नाही. तुम्ही त्याच्या जागी कोणाला घ्याल? वस्तुनिष्ठपणे बोलायचे झाल्यास, तो फक्त संजू सॅमसन, अभिषेक शर्मा किंवा ईशान किशन यांच्या जागीच खेळू शकतो.”

चोप्राच्या मते, वैभवची प्लेइंग इलेव्हनमधील अनुपस्थिती ही प्रामुख्याने त्याच्या क्षमतेबद्दलच्या कोणत्याही प्रश्नामुळे नसून, उपलब्ध जागांच्या कमतरतेमुळे आहे. सूर्यवंशीला संधी देण्यासाठी आघाडीच्या फलंदाजांना रोटेट करणे हा एक मार्ग असू शकतो. पण असं होईल हे वाटत नाही.”

चोप्रा तिलक वर्माबद्दल म्हणाला की, “जर तुम्ही म्हणत असाल की तिलक वर्मा अजिबात चांगली कामगिरी करत नाही, तर तुमचे म्हणणे थोडे चुकीचे आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिलक वर्माने दोन शतके झळकावली होती. त्यानंतर, विश्वचषकापूर्वी त्याला दुखापत झाली आणि काही समस्याही आल्या. त्याला नेहमीच त्याच्या पसंतीच्या स्थानावर फलंदाजी करता आली नाही, केवळ या कारणास्तव त्याच्या कामगिरीकडे दुर्लक्ष केले जाऊ नये.”

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्
Tiger Shroff Case : टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट समोर; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्.....
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी...
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; फोन करणारा कोण?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट गणेश नाईकांकडे धाव
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात...
Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष
टायगर श्रॉफला भेटले मात्र...; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
Ram Purneker On Tiger Shroff Car : टायगर श्रॉफला भेटले मात्र आमच्यासाठी वेळ नाही; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी...
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान;
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान; म्हणाले...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी हतबल
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?- राऊत
Sanjay Raut: शिंदे टायगर श्रॉफला भेटले, मग पुर्णेकर कुटुंबाला का नाही भेटले?