AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सेहवाग-द्रविडची मुलं आता थेट भारतीय संघात, वनडे टीममध्ये मिळाली जागा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज

भारतीय संघासाठी वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांनी एक काळ गाजवला होता. आता यानंतर त्यांची मुले भारतीय संघासाठी खेळण्यासाठी सज्ज झाली आहेत. त्यांची भारतीय संघात निवड झाली आहे.

सेहवाग-द्रविडची मुलं आता थेट भारतीय संघात, वनडे टीममध्ये मिळाली जागा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज
| Updated on: Aug 27, 2026 | 12:47 PM
Share

बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. पुरुष निवड समितीने ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाच्या भारत दौऱ्यासाठी भारतीय १९ वर्षांखालील संघांची घोषणा केली आहे. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाचा १९ वर्षांखालील संघ तीन एकदिवसीय आणि दोन मल्टी डे सामने खेळणार आहे. दोन्ही मालिकांसाठी भारतीय १९ वर्षांखालील संघांची घोषणा करण्यात आली आहे. तिन्ही एकदिवसीय सामने आणि पहिला मल्टी डे सामना राजकोटमध्ये खेळला जाईल, तर दुसरा बहुदिवसीय सामना अहमदाबादमध्ये होणार आहे.

एकदिवसीय सामन्यांसाठी लक्ष्य रायचंदानीकडे कर्णधारपद, तर उपकर्णधारपद देण्यात आले आहे. मल्टी डे सामन्यांमध्ये लक्ष्य आणि यशवर्धन यांच्यात जबाबदाऱ्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. याचा अर्थ, मल्टी डे सामन्यांमध्ये यशवर्धन चौहान भारतीय १९ वर्षांखालील संघाचे कर्णधारपद भूषवेल, तर लक्ष्य रायचंदानी उपकर्णधार असेल.

भारताचे माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड यांच्या मुलांनाही एकदिवसीय सामन्यांसाठी निवडलेल्या भारतीय १९ वर्षांखालील संघात संधी देण्यात आली आहे. निवड समितीने सेहवागचा मुलगा आर्यवीर सेहवाग आणि राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना संघात स्थान दिले आहे. अन्वयचा संघात यष्टीरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. मल्टी डे सामन्यांसाठी निवडलेल्या संघात आर्यवीर आणि अन्वय यांचा समावेश नाही. आर्यवीर या मोसमात दिल्ली प्रीमियर लीग (डीपीएल) मध्ये वेस्ट दिल्ली लायन्स संघाकडून खेळला होता.

भारताचा एकदिवसीय सामन्यांसाठीचा १९ वर्षांखालील संघ: लक्ष्य रायचंदानी (कर्णधार), यशवर्धन चौहान (उपकर्णधार), रजत बघेल (यष्टीरक्षक), आर्यवीर सेहवाग, व्ही.के. विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड (यष्टीरक्षक), व्ही. यशवीर, रोहित यादव, शविन विनोद, मोहित उलवा, चिगुरुपती व्यंकट, काव्या पटेल.

मल्टी डे सामन्यांसाठी भारताचा अंडर 19 संघ: यशवर्धन चौहान (कर्णधार), लक्ष्य रायचंदानी (उपकर्णधार), सागर विर्क, कुशाग्र ओझा, मनाल चौहान, कुश पटेल, मानव कृष्णा (यष्टीरक्षक), अभिप्रय बिस्वास (यष्टीरक्षक), रोहित यादव, इशान ओम, अयान अकरम, प्रणव राघवेंद्र, प्रियांशु सिंह, मोहित उलवा, आर्यन यादव.

ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील भारत दौऱ्याचे वेळापत्रक पहिला एकदिवसीय सामना: १८ सप्टेंबर, २०२६, राजकोट (सकाळी ९ वाजता) दुसरा एकदिवसीय सामना: २१ सप्टेंबर, २०२६, राजकोट (सकाळी ९ वाजता) तिसरा एकदिवसीय सामना: २३ सप्टेंबर, २०२६, राजकोट (सकाळी ९ वाजता) पहिला मल्टी डे सामना: २७-३० सप्टेंबर, २०२६, राजकोट (सकाळी ९:३० वाजता) दुसरा मल्टी डे सामना: ५-८ ऑक्टोबर, २०२६, अहमदाबाद बी मैदान (सकाळी ९:३० वाजता)

Follow Us
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
नेपाळ महाप्रलयाबाबत थक्क करणारी अपडेट; उशीरा दिली माहिती, चीनच्या मनात
नेपाळ महाप्रलयाबाबत थक्क करणारी अपडेट; पाऊण तास उशीरा दिली माहिती, चीनच्या मनात नेमकं काय होतं?
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलक
नागपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच, मंत्री अशोक उईके आंदोलकांना भेटणार
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज