CSK vs SRH : इशान किशनचा धोनी समोर उद्धटपणा, CSK फॅन्स खवळतील अशी कृती VIDEO

CSK vs SRH : सनरायजर्स हैदराबादने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्सला त्यांच्या घरच्या मैदानात हरवलं. या विजयानंतर इशान किशन चर्चेचा विषय बनला आहे. त्यांनी एमएस धोनी समोर असताना उद्धटपणा केला.

CSK vs SRH : इशान किशनचा धोनी समोर उद्धटपणा, CSK फॅन्स खवळतील अशी कृती VIDEO
Ishan Kishan
Image Credit source: PTI
| Updated on: May 19, 2026 | 11:09 AM

IPL 2026 मध्ये काल चेन्नई येथे सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सचा सामना झाला. हैदराबादने या मॅचमध्ये चेन्नईवर विजय मिळवला. या विजयामुळे SRH चा प्लेऑफमध्ये प्रवेश निश्चित झाला असून CSK ची वाट बिकट बनली आहे. इशान किशन सनरायजर्स हैदराबादच्या विजयाचा हिरो ठरला. ही मॅच जिंकल्यानंतर इशान किशनने जे केलं, त्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. त्याने धोनीसमोर उद्धटपणा केला. CSK च्या चाहत्यांना पाहून त्याने शिटी वाजवली. जणू, त्यांना डिवचण्याचा, चिडवण्याचा इशानचा प्रयत्न होता. इशानने असे इशारे केले, त्यावरुन असं वाटलं की, तो फॅन्सना स्टेडियममधून जायला सांगत आहे.

CSK vs SRH सामना संपल्यानंतर चेपॉकच्या स्टेडियममध्ये इशानने जे केलं, त्याची प्रत्येक कृती कॅमेऱ्यात कैद झाली आहे. CSK च्या खेळाडूंशी हस्तांदोलन केल्यानंतर इशान स्टेडियममध्ये बसलेल्या CSK च्या फॅन्सकडे पाहून शिट्टी वाजवत होता. इशान हे काम करत असताना धोनीचं तिथे SRH चे अन्य खेळाडू आणि सपोर्ट स्टाफशी हस्तांदोलन सुरु होतं.

चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी शिटी वाजवतात. त्याला व्हिसिल पोडू म्हणतात. SRH विरुद्ध सामन्यातही CSK फॅन्सच्या शिट्ट्या थांबत नव्हत्या. पण CSK हरल्यानंतर इशानने त्यांच्यासमोर शिट्टी वाजवली.

इशान किशन फक्त शिटी वाजवून थांबला नाही, तर CSK फॅन्सना त्याने स्टेडियममधून निघून जाण्याचा इशारा केला. CSK विरूद्धच्या या मॅचमध्ये इशान किशन प्लेयर ऑफ द मॅच बनला. त्याने 47 चेंडूत 70 धावा केल्या. या सीजनमधील त्याची पाचवी फिफ्टी आहे. यात 7 फोर आणि 3 सिक्स होते. चेन्नईने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 181 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हैदराबादने हे आव्हान इशान किशन आणि हेन्रिक क्लासेन या दोघांच्या खेळीच्या जोरावर एक ओव्हरआधीच पार केलं.

Follow Us