Wasim Akram : अक्रमने मिसबाहला विचारला ‘मिलियन डॉलर’ सारखा प्रश्न

टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या टीममध्ये सध्या चांगले खेळाडू असल्याने दोन्ही टीममधील संघर्ष रविवारी सगळ्यांना पाहायला मिळणार आहे.

Wasim Akram : अक्रमने मिसबाहला विचारला मिलियन डॉलर सारखा प्रश्न
मिसबाहचं अक्रमला खळबळजनक उत्तर
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 18, 2022 | 11:55 AM

टीम इंडियाची (Team India) पाकिस्तानची (Pakistan) मॅच येत्या रविवारी होणार आहे. त्यामुळे दोन्ही टीम माजी खेळाडू आमची टीम कशी चांगली आहे, हे सांगण्यात गुंग आहेत. परंतु पाकिस्तानच्या काही खेळाडूंची अक्रमने (wasim akram) मुलाखत घेतली. त्यामध्ये अनेक प्रश्न आक्रमने खेळाडूंना विचारले. पण मिसबाहला (misbah ul haq) विचारलेल्या प्रश्न अधिक व्हायरल झाला आहे.

आक्रमने मिसबाहला प्रश्न विचारला की, आपल्या टीममध्ये कोणी रिव्हर्स शॉट का खेळत नाही. यावर मिसबाहने सांगितले की, ज्यावेळी टीम इंडियाने विश्वचषक जिंकला. त्यावेळी रिव्हर्स शॉट खेळलो आणि बाद झालो…पाकिस्तानची टीम हारली.

जेव्हापासून पाकिस्तानची टीम हारली आहे, तेव्हापासून पाकिस्तानच्या खेळाडूंनी रिव्हर्स शॉट खेळणे बंद केले आहे. आजही जेव्हा माझ्यासमोर तो व्हिडीओ आला की मी दु:खी होतो असं मिसबाहने सांगितले.

टीम इंडिया आणि पाकिस्तानच्या टीममध्ये सध्या चांगले खेळाडू असल्याने दोन्ही टीममधील संघर्ष रविवारी सगळ्यांना पाहायला मिळणार आहे.

टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विश्‍व के.), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.के. अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.

पाकिस्तान टीम

बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद , फखर जमान.