ऋषभ पंतला सोडून Urvashi Rautela या पाकिस्तानी क्रिकेटवर फिदा

संबंधित व्हिडीओ उर्वशी रौतेलाच्या एका फॅन पेजवरती होता. त्यानंतर तो व्हिडीओ उर्वशी रौतेलाने आपल्या इंन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला आहे.

ऋषभ पंतला सोडून Urvashi Rautela या पाकिस्तानी क्रिकेटवर फिदा
ऋषभ पंतला सोडून Urvashi Rautela या पाकिस्तानी क्रिकेटवर फिदा
Image Credit source: instagram
| Updated on: Sep 08, 2022 | 4:32 PM

आशिया चषक (Asia Cup 2022) दुबईमध्ये (Dubai) पाहायला गेलेल्या उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) अधिक चर्चेत आहे. तिचं वैयक्तिक आयुष्य मागच्या काही दिवसांपासून अधिक चर्चेत आलं आहे. या अभिनेत्रीचं नाव भारतीय संघातील खेळाडू ऋषभ पंत सोबत जोडले गेले होते. मागच्या काही दिवसांपासून तिची आणि भारतीय संघातील खेळाडू ऋषभ पंतची सोशल मीडियावर अधिक चर्चा होती. त्याचबरोबर तिने ऋषभ पंतला क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ज्यावेळी सामना झाला त्यावेळी ती पाकिस्तानच्या एका क्रिकेटपट्टूला पाहायला आली होती अशी सद्या सोशल मीडियावर चर्चा आहे.

मैदानाबाहेर अधिक चर्चा

उर्वशी रौतेला भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत यांच्यात मतभेद असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे ज्यावेळी उर्वशी रौतेला क्रिकेट मॅच पाहायला येते. त्यावेळी ऋषभ पंतची क्रिकेटच्या मैदानामध्ये आणि बाहेर सुध्दा अधिक चर्चा असते.

इंन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला

उर्वशी रौतेलाने इंन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे तिला पाकिस्तानी क्रिकेटपट्टू आवडल्याची चर्चा सुरु झाली. क्रिकेटपटू ऋषभ पंत उर्वशी रौतेलाच्या भांडणात नसीम शाहचा व्हिडीओ तिने शेअर केल्यामुळे सर्वत्र दोघांची चर्चा सुरु झाली आहे. त्यामध्ये नसीम खान हसताना दिसत आहे. तर उर्वशी त्याच्याकडे पाहून लाजत असल्याचे दिसले व्हिडीओत दिसत आहे.

संबंधित व्हिडीओ उर्वशी रौतेलाच्या एका फॅन पेजवरती होता. त्यानंतर तो व्हिडीओ उर्वशी रौतेलाने आपल्या इंन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला आहे. नेटकऱ्यांनी उर्वशी रौतेला हीला कमेंटच्या माध्यमातून अनेक प्रश्न विचारले आहेत.