AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Arjun Tendulkar : सचिनचा लाडका मुलगा अर्जुन तेंडुलकरचा आवडता पदार्थ कोणता ? नाव ऐकताच तुमच्या तोंडालाही सुटेल पाणी

Arjun Tendulkar favourite food : सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या IPL 2026 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून खेळत आहे. महिन्याभरापूर्वी सानिया चंडोकसोबत त्याचे लग्न झाले. अलीकडेच त्याने एक पोस्ट करत त्याचा आवडता पदार्थ कोणता ते नमूद केलं होतं.

Arjun Tendulkar : सचिनचा लाडका मुलगा अर्जुन तेंडुलकरचा आवडता पदार्थ कोणता ? नाव ऐकताच तुमच्या तोंडालाही सुटेल पाणी
| Updated on: Apr 07, 2026 | 2:04 PM
Share

क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर अशा अनेक नावांनी प्रसिद्ध असलेला सचिन तेंडुलकर हा रिटायर होऊन अनेक वर्ष झाली तरी त्याच्या नावाचा, खेळाचा दबदबा अजूनही कायम आहे. त्याच्याप्रमाणेच त्याच्या घरचेही खूप चर्चेत असतात. पत्नी अंजली असो की मुलगी सारा अतवा मुलगा अर्जुन, तेंडुलकर कुटुंबियांबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता तर असतेच. अर्जुन तेंडुलकरबद्दल सांगायचं झालं तर वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन तोही क्रिकेटच्या मैदानावरच खेळताना दिसतो. सध्या तो आयपीएल 2026 मध्ये खेळत असून लखनऊ सुपर जायंट्स टीमचा एक भाग आहे.

अर्जुन तेंडुलकरचं नुकतंच, महिन्याभरापूर्वी लग्न झालं. सानिया चंडोक हिच्याशी त्याने मार्चच्या पहिल्या आठवड्यात लग्न केलं. त्यांच्या मेहंदी समारंभापासूते लग्नापर्यंतचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. सचिन, अंजली, सारा, अर्जुन आणि सानिया यांचा फॅमिली फोटोही लोकांना खूपच आवडला होता.

मात्र याच अर्जुन तेंडुलकरमुळे सध्या आयपीएलमधील सनरायजर्स हैदराबादचा एक सदस्य चांगलाच परेशान आहे. त्याला अक्षरश: घाम फुटला, पण त्याचं काही वेगळं कारण नाहीये. खरंतर अर्जुनच्या आवडीची एक डिश खाऊन काव्या मारनच्या संघातील एका खेळाडूची हालत बेकार झाली होती.कोण होता तो खेळाडू आणि अर्जुनचा आवडता पदार्थ कोणता? , चला जाणून घेऊया.

अर्जुन तेंडुलकरचा आवडता पदार्थ कोणता ?

आयपीएल मधील काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबादमधील ज्या खेळाडूविषयी आपण बोलत आहोत, त्याचं नाव हेनरिक क्लासेन आहे. हेनरिक क्लासेन आणि इशान किशन हैदराबादी बिर्याणीचा आस्वाद घेत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. इशान किशनला मसालेदार हैदराबादी बिर्याणी खाताना फारसा त्रास झाला नाही. मात्र, ज्याला इतक्या तिखट खाण्याची सवय नाही, त्या हेनरिक क्लासेनला घाम फुटला. तो खाता खाताच रुमालाने घाम पुसताना दिसला. क्लासेनला असे करताना पाहून इशानला सुद्धा हसू आवरलं नाही.

खरंतर हैदराबादी बिर्याणी हा अर्जुन तेंडुलकरचा अतिशय आवडता पदार्थ आहे. त्याने नुकतीच हैदराबादी बिर्याणीबद्दल एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली, जगातील सर्वोत्तम पदार्थ, असल्याचं त्याने त्यात नमूद केलं होतं. पण हाच स्वादिष् पदार्थ खाऊन सनरायजर्सच्या क्लासेनची जी अवस्था झाली, त्याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही.

IPL 2026 मध्ये SRH आणि क्लासेन

IPL 2026 मधील काव्या मारनच्या संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या तीन सामन्यांपैकी एक जिंकला आहे, तर दोन गमावले आहेत. एसआरएचचा संघ हा दोन गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये 5 व्या स्थानावर आहे. हेनरिक क्लासेन हा सनरायझर्स हैदराबादसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून, त्याने 3 सामन्यांमध्ये दोन अर्धशतकांसह 145 धावा केल्या आहेत.

Follow Us
मुंबईच्या मढ किनाऱ्याजवळ संशयित जहाज!; कोणत्या देशाचे? काय आहे आत?
Mumbai | मुंबईच्या मढ किनाऱ्याजवळ संशयित जहाज!; कोणत्या देशाचे? काय आहे आत? तपास सुरू
भिडे पूल पाण्याखाली; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Pune Rain | भिडे पूल पाण्याखाली; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर
Breaking! मुंबई–पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा दरड कोसळली; वाहतूक एकाच लेनवर, प्रशासन अॅक्शन मोडमध्ये
'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं
Sunetra Pawar | 'दादांच्या आठवणी कुठे नाहीत...' पंढरपूर वारीदरम्यान सुनेत्रा पवारांचं भावनिक विधान
कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
Heavy Rain | कल्याण-डोंबिवलीत पुन्हा पावसाचा कहर! अचानक मुसळधार सरींनी नागरिकांची धावपळ
जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
NDAमध्ये शरद पवारांची एन्ट्री? जयंत पाटील–विनोद तावडे भेटीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्...
इतका भयंकर वेग की मोठमोठे कंटेनर फरफटले गेले, दोघांचा मृत्यू अन्... भुस्खलनाचा थरारक व्हिडीओ समोर
मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
Amit Satam | मृत्यूवर हसलो नाही! अमित साटम यांचा सभागृहात मोठा खुलासा; म्हणाले...
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही
देवस्थानाच्या पाहणीला गेले अन् कार चिखलातच अडकली; गिरीश महाजन यांनाही पूरस्थितीचा फटका
खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा
Navi Mumbai | खाली धावपट्टी आहे की नाही? हेच समजेना! अखेर वैमानिकाने... अंगावर काटा आणणारा व्हिडीओ