Asia Cup 2022 : सोशल मीडियावर विराट कोहलीच्या शतकाची जोरदार चर्चा, चाहत्यांच्या सेलिब्रेशनने सर्व रेकॉर्ड तोडले

शतक झाल्यानंतर विराटच्या चाहत्यांनी सगळे रेकॉर्ड विराटच्या नावावर झालेत असं ट्रोलिंग सुरु केलं होतं.

Asia Cup 2022 : सोशल मीडियावर विराट कोहलीच्या शतकाची जोरदार चर्चा, चाहत्यांच्या सेलिब्रेशनने सर्व रेकॉर्ड तोडले
चाहत्यांच्या सेलिब्रेशनने सर्व रेकॉर्ड तोडले
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Sep 09, 2022 | 9:19 AM

आशिया चषकातून (Asia Cup 2022) बाहेर पडल्यानंतर टीम इंडियाची (India) औपचारिक मॅच काल अफगाणिस्तान (Afganistan) सोबत झाली. त्यावेळी टीम इंडियाने चांगली कामगिरी केल्यामुळे त्यांचा विजय झाला. श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या विरोधात टीम इंडियाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावरती सोशल मीडियाच्या माध्यामातून नेटकऱ्यांनी जोरदार टीका केली होती. काल विराट कोहलीने शतक झळकावल्यानंतर त्यांचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

काल विराट कोहलीने तीन वर्षानंतर शतक मारलं. 61 चेंडूत त्याने 122 धावा त्याने केल्या. त्यानंतर विराट कोहलीने मैदानात त्यांच्या स्टाईलने जल्लोष केला. कारण मागच्या तीन वर्षात शतकाच्या समीप जाऊन तो अनेकदा बाद झाला होता.

शतक झाल्यानंतर विराटच्या चाहत्यांनी सगळे रेकॉर्ड विराटच्या नावावर झालेत असं ट्रोलिंग सुरु केलं होतं. त्याचबरोबर कालच्या शतकाचं सगळं श्रेय त्याची पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिकाला दिलं आहे. विराट कोहलीचे जुन्या मॅचमधील सुद्धा काही व्हिडीओ सोशल मीडियावर फिरत आहेत.

सोशल मीडियावर सुपर चार मधील महत्त्वाचे सामने हारल्यापासून भारतीय टीम मधील अनेक गोलंदाजांना ट्रोल केलं जात आहे. त्याचबरोबर भारताच्या माजी खेळाडूंनी सुद्धा सध्या परिस्थितीवर प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे.