AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs ENG Ashes 2nd Test Day 2: स्मिथ-कारीची जोडी जमली, इंग्लिश गोलंदाज हतबल

ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्याचे इंग्लंडसमोर आव्हान आहे. आधीच इंग्लंडचा संघ मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे.

AUS vs ENG Ashes 2nd Test Day 2: स्मिथ-कारीची जोडी जमली, इंग्लिश गोलंदाज हतबल
| Edited By: | Updated on: Dec 17, 2021 | 1:44 PM
Share

मेलबर्न: अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes Series) दुसऱ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. ऑस्ट्रेलियाने पाच विकेट गमावून ३५० धावांचा टप्पा पार केला आहे. कालच्या तुलनेत आज इंग्लिश गोलंदाज थोडे प्रभावी ठरले. आज ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना माघारी धाडण्यात इंग्लंडचे गोलंदाज यशस्वी ठरले. पण अजूनही पूर्णपणे इंग्लंडचा संघ या कसोटीवर वर्चस्व गाजवताना दिसत नाहीय. कर्णधार स्टीव स्मिथची अ‍ॅलेक्स कारी बरोबर जोडी जमली आहे. स्मिथने अर्धशतक झळकावलं आहे.

आज इंग्लंडने मार्नस लाबुशेन, ट्रेव्हिस हेड आणि कॅमरॉन ग्रीन या तिघांना बाद केले. आज सकाळी खेळाला सुरुवात झाल्यानंतर ९५ धावांवर खेळणाऱ्या मार्नस लाबुशेनने शतक पूर्ण केले. कसोटी करीयरमधील त्याचे हे सहावे शतक आहे. शतकानंतर लाबुशेन खेळट्टीवर फारवेळ टिकला नाही. रॉबिनसनने त्याला 103 धावांवर पायचीत केले. हेडला १८ धावांवर रुटने क्लीन बोल्ड केले, तर ग्रीनच्या अवघ्या 2 धावांवर स्टोक्सने यष्टया वाकवल्या.

ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्याचे इंग्लंडसमोर आव्हान आहे. आधीच इंग्लंडचा संघ मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. काल पहिल्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने (AUS vs ENG) फक्त दोन विकेट गमावून २२१ धावा केल्या होत्या. इंग्लिशन गोलंदाज वॉर्नर-लाबुशेन जोडीसमोर निष्प्रभ ठरले होते. ब्रिस्बेनच्या पहिल्या कसोटी प्रमाणे इथेही डेविड वॉर्नर (David warner) आणि मार्नस लाबुशेनमध्ये (Marnus Labuschagne) शानदार भागीदारी झाली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १७२ धावांची भागीदारी केली होती. वॉर्नरचे शतक अवघ्या पाच धावांनी हुकले. त्याने ९५ धावांच्या खेळीत ११ चौकार लगावले. वॉर्नरला स्टोक्सने बाद केले.

संबंधित बातम्या: IND VS SA: कॅप्टन कोहली २९ वर्षांपासूनची विजयाची प्रतिक्षा संपवणार, गांगुलीला विश्वास India south Africa Tour Video : जोहान्सबर्गला जाताना विमानात विराटने इशांत शर्माला डिवचलं विराट, गेलला जमलं नाही, ते पाकिस्तानच्या मोहम्मद रिजवानने करुन दाखवलं, बाबर म्हणाला….

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.