क्रिकेटपटूंनाही आता मिळणार मातृत्व रजा

ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्ड महिला खेळाडूंना एका वर्षाची मातृत्त्व रजा देणार आहे. शिवाय, संपूर्ण वर्ष त्यांना पगारही देणार आहे.

क्रिकेटपटूंनाही आता मिळणार मातृत्व रजा
Follow us
| Updated on: Jan 01, 2020 | 5:30 PM

मुंबई : नोकरी करणाऱ्या महिलांना अनेकदा गर्भवती असल्याने आपलं करिअर सोडावं लागतं. काहींना नाईलाज असतो, तर काही आपल्या मुलांचा सांभाळ करण्यासाठी करिअरला स्वत:हून बाजूला सारतात. तर काहींना कंपनीच्या मातृत्त्व रजेचे धोरण योग्य नसल्याने नोकरी गमवावी लागते (Parental Leave Scheme).

अनेक काळापासून चालत आलेल्या या मातृत्त्व रजा धोरणांना अपवाद म्हणून ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने एक नवं धोरणं जगासमोर ठेवलं आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने महिला खेळाडूंना एका वर्षाची मातृत्त्व रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, संपूर्ण वर्ष त्यांना पगारही देणार आहे. जेष्ठ खेळाडू जेस डफिन ही ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाच्या या मातृत्त्व रजा धोरणांचा लाभ घेणारी पहिली महिला क्रिकेटर ठरली आहे (Jess Duffin).

जेस डफिनने बोर्डाला ती गर्भवती असल्याची माहिती दिली. त्यानंतर बोर्डाने त्यांना एक वर्षाची रजा आणि संपूर्ण वर्षाचा पगार देण्याचा निर्णय घेतला. यासोबतच यावर्षी फेब्रुवारी महिन्यात होत असलेल्या महिला टी-20 विश्वचषकात 30 वर्षीय जेस डफिन ही गर्भवती असल्याने खेळू शकणार नाही.

मात्र, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मध्ये अशा प्रकारचं कुठलंही धोरण नाही. त्यामुळे जर भविष्यात कुठल्या महिला खेळाडूला अशा प्रकारची गरज पडली तर बीसीसीआय काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने घेतलेला हा निर्णय खरंच कौतुकास्पद आहे.

Australia Cricket parental leave scheme

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.