AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK: पाकिस्तानच्या जखमेवर बीसीसीआयनं मीठ चोळलं, थेट जागा दाखवून दिली, ऐकून पाकला झोंबतील मिर्च्या

BCCI On Pakistan: भारत आणि पाकिस्तान आशियाई क्रीडा स्पर्धेतील फायनल सामना भारतीय संघाने जिंकला. यानंतर आता बीसीसीआयने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

IND vs PAK: पाकिस्तानच्या जखमेवर बीसीसीआयनं मीठ चोळलं, थेट जागा दाखवून दिली, ऐकून पाकला झोंबतील मिर्च्या
| Updated on: Oct 04, 2026 | 1:54 PM
Share

IND vs PAK: आशियाई क्रीडा स्पर्धेतील फायनल सामन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगला. या सामन्यात नेहमीप्रमाणे भारतीय संघाने बाजी मारली, भारत आणि पाकिस्तान संघातील सामना म्हटलं की भारताचा विजय हा आता ठरलेलाच असतो.  पाकिस्तानला पराभवाचा झटका दिल्यानंतर बीसीसीआयने पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळले आहे.

बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मनहास यांनी शनिवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करून आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक कायम राखल्याबद्दल भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे कौतुक केले. बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मनहास म्हणाले की, “यापूर्वी, भारतीय महिला संघाने गेल्या आठवड्यात आपले सुवर्णपदक कायम राखले होते. आपण गतविजेते आहोत आणि संघाने यावेळी ज्या प्रकारे कामगिरी केली आहे ती कौतुकास्पद आहे, विशेषतः दबावाखाली केलेल्या कामगिरीबद्दल मला आनंद आहे. त्यांनी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत केले, जे खरं तर आव्हानात्मक नाहीये. भारतीय संघाची बरोबरी जगातील इतर कोणताही संघ करू शकत नाही.” पाकिस्तान खरं तर आव्हानात्मक वाटत नाही असं म्हणतं त्यांनी पाकिस्तानला लिंबी टिंबू संघ म्हटले आहे आणि त्यांची लायकी काढली आहे.

मी येथे जय शाह यांचे पुन्हा एकदा आभार मानू इच्छितो. ते त्यावेळी (बीसीसीआयचे) सचिव होते आणि हा संघ उभारण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. केवळ पुरुष संघच नाही, तर आमच्या महिला संघानेही (एकदिवसीय) विश्वचषक जिंकला आहे. यात त्यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यामुळे, त्यांचेही विशेष आभार.” असं म्हणंत मन्हास यांनी जय शाह यांचे कौतुक केले आहे. मन्हास यांनी आशियाई खेळांमधील विजय क्रिकेट चाहत्यांना आणि सशस्त्र दलांना समर्पित केला. ते म्हणाले, “माझ्या मते, हा विजय भारतीय संघासाठी प्रार्थना करणाऱ्या लाखो चाहत्यांना, विशेषतः देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या सैनिकांना समर्पित केला पाहिजे.”

शेवटच्या षटकापर्यंत अतिशय रोमांचक सामना रंगत होता पण शेवटी विजय हा भारतीय संघाचाच झाला. १९ धावांनी सामना जिंकला आणि भारतीय संघाने जापानमध्ये तिरंगा फडकावला.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात
ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
Sanjay Raut At Mumbai : ज्ञानेश कुमारला हटवण्यासाठीचा हा मोर्चा आता... संजय राऊत काय म्हणाले?
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब..
लोकांच्या मॉर्निंग वॉकचं अंतर तुमच्या मोर्च्याच्या मार्गापेक्षा लांब आहे, भाजप नेत्याची जिव्हारी लागणारी टीका
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा...
ज्ञानेश कुमारांविरोधात ठाकरे बंधूंचा मुंबईत मोर्चा, अनिल परब यांचा भाजपवर निशाणा
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
ठाकरे बंधूंच्या नेतृत्वात आज गर्जना मोर्चा, बडा नेता होणार सहभागी
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान
शिवसैनिकांच्या अनोख्या बॅनरची तुफान चर्चा; उद्धव ठाकरे भावी पंतप्रधान अन् राज ठाकरे तर थेट...