मॅच हरल्याने चिअर लीडर भर मैदानात रडली

KKRvsRR कोलकाता :  कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने केकेआरवर 3 विकेट्स राखून विजय मिळवला. अटीतटीच्या सामन्यात राजस्थानला शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती. त्यावेळी जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) प्रसिद्ध क्रिष्णाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकून, राजस्थानला विजय मिळवून दिला. केकेआर पुन्हा एकदा हरल्यामुळे केकेआरचे फॅन्स पुरते निराश …

मॅच हरल्याने चिअर लीडर भर मैदानात रडली

KKRvsRR कोलकाता :  कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने केकेआरवर 3 विकेट्स राखून विजय मिळवला. अटीतटीच्या सामन्यात राजस्थानला शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती. त्यावेळी जोफ्रा आर्चरने (Jofra Archer) प्रसिद्ध क्रिष्णाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकून, राजस्थानला विजय मिळवून दिला. केकेआर पुन्हा एकदा हरल्यामुळे केकेआरचे फॅन्स पुरते निराश झाले. नुसते फॅन्स नाही, तर मैदानावर केकेआरची चिअर लीडरही रडताना दिसली. राजस्थानने केकेआरला त्यांच्याच होम ग्राऊंडवर हरवल्यामुळे केकेआरच्या चिअर लीडरला अश्रू अनावर झाले आणि ती मैदानावरच रडू लागली.

राजस्थान आणि कोलकातामधील या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकात्याने कर्णधार दिनेश कार्तिकच्या नाबाद 97 (50) धावांच्या जोरावर 20 षटकात 6 बाद 175 धावा केल्या होत्या. त्यामुळे राजस्थानला विजयासाठी 176 धावांची गरज होती. घरच्या मैदानात इडन गार्डन्सवर कोलकात्याची कामगिरी नेहमीच उत्तम असते, मात्र काल त्यांना विजय मिळवता आला नाही.  राजस्थानने कोलकात्यावर 3 विकेट्स राखून विजय मिळवला.

केकेआरचा सलग सहाव्या सामन्यात पराभव

आयपीएलच्या सध्याच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचा (Kolkata Knight Riders) आतापर्यंत 6 सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे आता केकेआरचं प्ले ऑफमध्ये पोहोचणं कठीण झालं आहे. प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता केकेआरला पुढील सामन्यात विजय आवश्यक आहे.

 कर्णधार दिनेश कार्तिक निराश

केकेआरच्या परफॉर्मन्सवर कर्णधार दिनेश कार्तिकनेही निराशा व्यक्त केली. “माझं काम टीमला सोबत ठेवणं आहे, अनेकदा परिस्थिती अनुकूल नसते. आम्ही एक संघ म्हणून खूप प्रयत्न केले. माझा माझ्या टीमवर पूर्ण विश्वास आहे. प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवणे कठीण आहे, हे अत्यंत निराशाजनक आहे”, असे कार्तिक म्हणाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *