CWG 2022 Day 2, Schedule: लवलीना-निकहत दाखवणार बॉक्सिंग पंचची ताकत, जाणून घ्या दुसऱ्या दिवसाचं पूर्ण शेड्यूल

कॉमनवेल्थ गेम्सचा आज दुसरा दिवसही Action ने भरलेला असेल. वेटलिफ्टिंगपासून एथलेटिक्स आणि टेबल टेनिस मध्ये भारतीय खेळाडू Action मध्ये दिसतील.

CWG 2022 Day 2, Schedule: लवलीना-निकहत दाखवणार बॉक्सिंग पंचची ताकत, जाणून घ्या दुसऱ्या दिवसाचं पूर्ण शेड्यूल
nikhat zarin
Image Credit source: twitter
| Updated on: Jul 30, 2022 | 12:11 PM

मुंबई: कॉमनवेल्थ गेम्सचा आज दुसरा दिवसही Action ने भरलेला असेल. वेटलिफ्टिंगपासून एथलेटिक्स आणि टेबल टेनिस मध्ये भारतीय खेळाडू Action मध्ये दिसतील. गेम्सचा दुसरा दिवस बॉक्सिंगच्या दृष्टीनेही भारतासाठी खास आहे. 30 जुलैला भारताचे 12 बॉक्सर्स रिंगणात उतरुन अभियानाची सुरुवात करतील. यात टोक्यो ऑलिम्पिक मधील कांस्यपदक विजेती लवलीना बोरगोहेन, वर्ल्ड चॅम्पियन निकहत जरीन आणि स्टार बॉक्सर अमित पंघाल यांचा समावेश आहे.

वेटलिफ्टिंग मध्ये भारताला गोल्डची अपेक्षा

भारताला शनिवारी दुसऱ्यादिवशी पहिलं पदक मिळू शकतं. भारताचे तीन वेटलिफ्टर शनिवारी Action मध्ये दिसतील. तिघांकडूनही देशाला पदकाची अपेक्षा असेल. टोक्यो ऑलिम्पिक मधील रौप्यपदक विजेती मीरबाई चानू 55 किलो वजनी गटात आव्हान सादर करेल. त्याशिवाय संकेत महादेव आणि सी रिशिकांता सिंह पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात मेडलसाठी उतरतील. हॉकीत लीग राऊंड मध्ये भारतीय महिला टीम वेल्सचा सामना करेल. स्क्वॉश मध्येही देशाचे स्टार खेळाडू जोश्ना चिनप्पा आणि सौरव घोषाल सिंगलमध्ये उतरतील.

जाणून घ्या दुसऱ्यादिवसाचं पूर्ण शेड्यूल

लॉन बॉल्स

पुरुष ट्रिप्लस – भारत विरुद्ध माल्टा – 01:00 PM

जिमनॅस्टिक्स

महिला टीम आणि व्यक्तिगत – दुपारी 1:30 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत.

एथलेटिक्स

मॅराथॉन – नतिंदर रावत – 11:00 AM

बॉक्सिंग (04:30 PM पासून सुरु)

अमित पंघाल – पुरुष (51 किलो)

मोहम्मद हुसामुद्दीन: पुरुष (57 किलो)

शिव थापा – पुरुष (63.5 किलो)

रोहित टोकस – पुरुष (67 किलो)

सुमित कुंडू – पुरुष (75 किलो)

आशीष चौधरी – पुरुष (80 किलो)

संजीत कुमार – पुरुष (92 किलो)

सागर अहलावत – पुरुष (92+किलो)

नीतू घनघास – महिला (48 किलो)

निकहत ज़रीन – महिला (50 किलो)

जॅस्मीन लॅबोरिया: महिला (60 किलो)

लवलीना बोरगोहेन: महिला (70 किलो)

हॉकी

महिला टीम – भारत विरुद्ध वेल्स – 11:30 PM

वेटलिफ्टिंग

मीराबाई चानू – महिला 49 किलो – 08:30 PM

संकेत महादेव – पुरुष 55 किलो – दुपारी 1:30 PM

सी रिशिकांता सिंह – पुरुष 55 किलो – दुपारी 1:30 PM

टेबल टेनिस

पुरुष टीम इवेंट – तीसरा राउंड – भारत बनाम नॉर्थ आयर्लंड – 04:15 PM

महिला टीम इवेंट – तीसरा राउंड – भारत विरुग्ध गयाना – 02:00 PM

स्क्वॉश

महिला सिंगल्स – राउंड ऑफ 32 – जोश्ना चिनप्पा, सुनयना – 5:45 PM

पुरुष सिंगल्स – राउंड ऑप 32 – रमित टंडन, सौरव घोषाल – 05:00 PM

टेबल टेनिस

पुरुष टीम इवेंट – तीसरा राउंड

महिला टीम इवेंट – तीसरा राउंड

बॅडमिंटन
मिक्स्ड टीम इवेंट – भारत विरुद्ध श्रीलंका (1:30 PM)