क्रिकेटचा देव सचिनच्या शिरपेचात मानाचा तुरा, वानखेडेमध्ये सचिनच्या पुतळ्याचं होणार अनावरण!

Sachin Tendulkar याचा मुंबईमधील वानखेडे मैदानावर मोठ 22 फुटी पुतळा उभारण्यात येणार आहे. सचिनसाठी मोठी गोष्ट असणार असून ज्या मैदानात त्याने अखेरचा सामना खेळला त्याच ठिकणी हा पुतळा बसवण्यात येणार आहे.

क्रिकेटचा देव सचिनच्या शिरपेचात मानाचा तुरा, वानखेडेमध्ये सचिनच्या पुतळ्याचं होणार अनावरण!
Harish Malusare | Updated on: Oct 31, 2023 | 2:57 PM

मुंबई : क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणाऱ्या सचिन तेंडुलकर याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जााणार आहे. मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये सचिनच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण बुधवार 1 नोव्हेंबरला करण्यात येणार आहे. नवीन खेळाडूंना त्याच्याकडे पाहून प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने हा पुतळा उभारण्यात येत आहे.

वानखेडेच्या ‘एमसीए’ लाउंजमध्ये हा सोहळा होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सचिनच्या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. या कार्यक्रमाला बीसीसीआयचे सचिव जय शाह, बीसीसीआय कोषाध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. सचिनने या मैदानावर अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत.

सचिनच्या पुतळ्याची १० फूट उंची तर हातामधील बॅट ४ फूट, त्याखाली संपूर्ण जग म्हणून बॉल दाखवला गेला आहे. त्यासोबत सचिनचं संपूर्ण नाव त्यावर लिहिण्यात येणार असून काही रेकॉर्डही असणार आहेत. अशी एकूण २२ फूट उंची संपूर्ण पुतळ्याची असणार आहे. सचिनचा पुतळा तयार करण्यासाठी त्याची कोणती पोझ घ्यायची यावर बरीच चर्चा झालेली. अखेर सचिनची एक सिक्स मारतानाची पोझ निश्चित केली गेली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे नगरचे चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी ही कलाकृती साकारली आहे.

दरम्यान, वानखेडे मैदानावरच 2011 साली वन डे मधील दुसरा वर्ल्ड कप जिंकला होता. सचिनला त्यावेळी खेळाडूंनी खांद्यावर घेत संपूर्ण मैदानात फेरी मारली होती. धोनीने शेवटच्या बॉलवर मारलेला सिक्सर आणि त्यावेळी रवी शास्त्री यांनी केलेले कॉमेट्री सर्व भारतीयांच्या मनात घर करून राहिली आहे. त्याच मैदानावर सचिनचा पुतळा बसवण्यात येत आहे.

Follow Us