AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation : ‘…तर मग मला सांगू नका’; मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता इशारा दिला!

Manoj Jarange Patil : राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून दुसऱ्यांदा उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांचा सातवा दिवस आहे. राज्यातील एकंदरित परिस्थिती पाहता जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांना आरक्षणाबाबत इशारा दिला आहे.

Maratha Reservation : '...तर मग मला सांगू नका'; मनोज जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना नेमका कोणता इशारा दिला!
manoj jarange patil-eknath shinde
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Oct 31, 2023 | 12:42 PM
Share

मुंबई : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चांगलाच चिघळत चालला आहे. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. मात्र सरकारने कोणतीही पाऊलं उचलली नाहीत त्यानंतर परत एकदा मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाचा सातवा दिवस असून सरकारकडून कोणतीही मोठी हालचाल दिसली नाही. राज्यभर हे आंदोलन उग्र रूप धारण करत असलेलं पाहायला मिळत आहे. राजकीय पुढाऱ्यांना गावात येण्यास बंदी घातली गेली असून ठिकठिकाणी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत हिंसा करू नका असं आवाहन सर्वांना केलं. मात्र यावेळी बोलताना जरागेंनी मुख्यमंत्र्यांना इशाराही दिला.

मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं मराठे शांत झालेत, तुम्ही पटकन आरक्षण द्या. मराठे सर्व शांत होतील का? तुम्ही अर्धवट आरक्षण देऊ नका. अर्धवट दिलं तर मला सांगू नका,  मराठवाड्यातील भाऊ तुमचे आहेत. महाराष्ट्रातील तुमचे नाही का. मराठवाड्यातील माझे आहेत मग पश्चिम महाराष्ट्रातील माझे नाही का. त्यामुळे सरसकट द्या. अर्धवट भूमिका नकोच. कुठूनही पुरावे घ्या, पण आरक्षण महाराष्ट्र भर द्या, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मी पाणी प्यायल्यानंतर मराठा समाज शांत झाला. मी त्यांना आवाहन करतो उद्रेक करू नका. जाळपोळ करू नका. मी लढतोय. तुम्हीही लढा. लढणाऱ्या मरणाला भिणार नाही. मी पाणी प्यायल्यापासून उठून बसलो. मी तुमच्यासमोर बोलतोय. समाजाने पाणी प्या म्हटलं. मी पाणी प्यायलं. आता तुम्ही शब्दाला पक्कं जागा. साखळी आणि आमरण उपोषण जसं सहन होईल तसं सुरू ठेवा. राजकीय नेत्यांना गावात येऊ देऊ नका, तुम्हीही त्यांच्याकडे जाऊ नका, असं जरागेंनी मराठ समाजाला सांगितलं आहे.

दरम्यान, मनोज जरांगे यांनी मराठा समाजाच्या तरूणांना आत्महत्या करू नका, जाळपोळ करू नका नाहीतर वेगळ निर्णय घ्यावा लागेल, असंही जरांगे-पाटील म्हणाले.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा