AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : चेन्नईच्या भविष्याविषयी महत्त्वाची ‘आकाशवाणी’, ‘पहिल्या 5 पैकी 3 सामने जिंकले तरी मोठी गोष्ट!’

पिवळ्या रंगाच्या जर्सीवाल्या चेन्नईची आयपीएल 2021 च्या हंगामाची सुरुवात धुमधडाक्यात होणार नाही, असा अंदाज आकाश चोप्राने वर्तवला आहे. | CSK aakash Chopra

IPL 2021 : चेन्नईच्या भविष्याविषयी महत्त्वाची 'आकाशवाणी', 'पहिल्या 5 पैकी 3 सामने जिंकले तरी मोठी गोष्ट!'
Akash Chopra And CSK team
| Updated on: Mar 31, 2021 | 11:53 AM
Share

मुंबई :  भारतीय संघाचा माजी सलामी फलंदाज तसंच सध्याचा आघाडीचा क्रिकेट समालोचक आकाश चोप्राने (Aakash Chopra) महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वाखालील चेन्नईच्या (Chennai Super Kings) आयपीएलमधील (IPL 2021) भविष्यासंबंधी मोठी कमेंट केली आहे. चेन्नई संघात जिंकण्यासाठी लागणाऱ्या आगीची धग कमी आहे तसंच चेन्नई पहिल्या 5 पैकी 3 सामने जिंकले तरी मोठी गोष्ट आहे, अशी कमेंट करत चेन्नईचा आयपीएलमधील प्रवास खडतर होईल, अशी भविष्यवाणी आकाश चोप्राने केली आहे. (Aakash Chopra Prediction About CSK performance in IPL 2021)

पिवळ्या रंगाच्या जर्सीवाल्या चेन्नईची आयपीएल 2021 च्या हंगामाची सुरुवात धुमधडाक्यात होणार नाही, असा अंदाज आकाश चोप्राने वर्तवला आहे. हा अंदाज वर्तवताना चेन्नईच्या सुरुवातीच्या मॅचेस या मुंबईत आहेत. मुंबईची विकेट ही फास्टर बोलर्सला मदत करते. मात्र चेन्नईची ताकद स्पिनर्स आहेत. त्यामुळे कदाचित चेन्नई बॅकफूटला जाऊ शकते, असा अंदाज आकाश चोप्राने लावला आहे.

आयपीएल 2021 च्या हंगामात चेन्नई 10 एप्रिलला दिल्लीशी भिडणार आहे. चेन्नईचे सुरुवातीचे पाच सामने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. त्यानंतर चेन्नई दिल्लीला जाणार आहे. तिथे अरुण जेटली स्टेडियमवर त्यापुढचे चार सामने चेन्नई खेळणार आहे. सीएसकेची टीम पुढचे 3 सामने बंगळुरुममध्ये खेळणार आहे आणि त्यापुढील 3 सामने कोलकात्याला खेळणार आहे.

आकाश चोप्राने काय म्हटलंय…?

आकाश चोप्राने त्याच्या फेसबुक अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्याने मुंबईचं पिच आणि सीएसकेचं कॉम्बिनेशन यावरती भाष्य केलं आहे. याच आधारावरती त्याने सीएसकेसाठी सुरुवातीच्या मॅचेस संघासाठी चांगल्या जाणार नाहीत, असा अंदाज वर्तवला आहे. आकाश चोप्राच्या म्हणण्यानुसार, चेन्नईने पहिल्या 5 पैकी 3 सामने जिंकले तरी मोठी गोष्ट असेल.

मुंबईत फास्टर बोलर्सचा बोलबाला, चेन्नईची ताकद स्पिन

“मुंबईच्या पीचवर फास्टर बोलर्स यशस्वी राहतात. या पीचवर 70 टक्के बॅट्समनच्या विकेट्स फास्टर गोलंदाज घेतात. दुसरीकडे चेन्नईच्या संघामध्ये स्पिनर्सचा भरणा आहे. करन शर्मा, इमरान ताहिर, रवींद्र जडेजा तसंच मिशल सँटनर अशा स्टार स्पिनर्सचा भरणा आहे.”

“चेन्नईच्या संघामध्ये फास्टर बोलर्सची ताकद कमी आहे. दीपक चहर, शार्दुल ठाकूर, सॅम करन, लुंगी नगीदी, ड्वेन ब्राव्हो आणि जोश हेजलवुड असे फास्टर बोलर्स आहेत. परंतु या बोलर्सची ताकद प्रतिस्पर्धी संघांना रोखू शकेल?”

(Aakash Chopra Prediction About CSK performance in IPL 2021)

हे ही वाचा :

मोठी बातमी : भारत पाकिस्तान आमने-सामने येणार, एप्रिलमध्ये तिरंगी टी ट्वेन्टी मालिका

IPL 2021 : सिनिअर खेळाडूंना बाजूला सारत रिषभ पंत दिल्लीच्या कर्णधारपदी, सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं ‘ट्रोलिंग वर्क!’

IPL 2021 : “माही भाईच्या नेतृत्वात खेळणं हा माझ्यासाठी गर्वाचा आणि आनंदाचा क्षण”

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.