AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : “माही भाईच्या नेतृत्वात खेळणं हा माझ्यासाठी गर्वाचा आणि आनंदाचा क्षण”

मला खरंच खूप आनंद होतोय. याच्याशिवाय दुसरा आनंदाचा क्षण असू शकत नाही. यासाठी चेन्नईची फ्रेंचायझी, श्रीनिवासन तसंच माही भाईचे आभार, असं पुजारा म्हणाला. | CSK Cheteshwar Pujara

IPL 2021 : माही भाईच्या नेतृत्वात खेळणं हा माझ्यासाठी गर्वाचा आणि आनंदाचा क्षण
Cheteshwar Pujara And MS Dhoni
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Mar 31, 2021 | 7:37 AM
Share

मुंबई :  आयपीएलमध्ये (IPL 2021) पुनरागमन करताना मला खूप आनंद होतोय. चेन्नई सुपर किंग्स (Channai Super Kings) ही लीग दुनियातील बेस्ट लीग आहे. या संघाचा एक भाग आहे, याचा मला आनंद आहे. त्यातही माही भाईच्या (MS Dhoni) कुशल नेतृत्वाखाली खेळायला मिळणं हा माझ्यासाठी आनंदाचा आणि गर्वाचा क्षण असल्याच्या भावना भारतीय कसोटी संघाची भिंत संयमी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Cheteshwar Pujara) व्यक्त केल्या आहेत. क्रिकबजशी तो बोलत होता. (IPL 2021 Cheteshwar Pujara Says Thank You Channai Super Kings And MS Dhoni)

चेन्नई सुपर किंग्समध्ये माझं पुनरागमन होतंय. मला खरंच खूप आनंद होतोय. याच्याशिवाय दुसरा आनंदाचा क्षण असू शकत नाही. यासाठी चेन्नईची फ्रेंचायझी, श्रीनिवासन तसंच माही भाईचे आभार, असं पुजारा म्हणाला.

फ्रेंचायझीकडून पुजाराची स्तुती

चेतेश्वर पुजारावर ज्या वेळी चेन्नईने बोली लावली तसंच त्याला खरेदी केलं त्यावेळी बाकी संघांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं. नंतर बोलताना एन श्रीनिवासन यांनी सांगितलं की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पुजाराने ज्या प्रकारे आपलं टेंपरामेंट दाखवलं, त्यावरुन तो आयपीएच्या संघात अनसोल्ड राहू नये, अशा माझ्या भावना होत्या.

काय म्हणाला चेतेश्वर पुजारा

श्रीनिवासन यांच्या कौतुकावर बोलताना पुजाराने त्यांचे आभार मानले. हे खरोखर त्यांचं मोठेपण आहे. मी अशा टीमचा भाग आहे जी टीम आंतरराष्ट्रीय कसोटीतील्या प्रदर्शनाचा आदर करते. मी नशीबवान आहे की माही भाईच्या नेतृत्वाखाली मी खेळणार आहे. माझं आंतरराष्ट्रीय पदार्पण माही भाई कर्णधार असतानाच झालं होतं आताही आयपीएलमधलं माझं पुनरागमन माही भाईच्याच नेतृत्वाखाली होतंय, यापेक्षा आनंददायी काय असू शकते, अशा भावना पुजाराने व्यक्त केल्या.

कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूविषयी एक मत तयार केलं जातं. छोट्या फॉरमॅटमध्ये त्याला फारशी संधी दिली जात नाही. अशात आपल्यातला खेळ दाखवण्याची कधी कधी संधीही मिळत नाही. आता माझ्या भावना आहेत की, आयपीएलच्या चेन्नई संघात मी अतिशय योग्य जागी आहे. मी संधी मिळताच योग्य प्रदर्शन करेल, असा विश्वास त्याने यावेळी व्यक्त केला.

षटकार मारण्याचा कसून सराव

चेतेश्वर पुजाराची ओळख एक चिवट खेळाडू म्हणून आहे. तो खेळपट्टीवर उभा राहण्यात त्याचा हात कुणाला धरु देणार नाही. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला आऊट करताना बोलर्स अगदी त्रासून जातात. अशातच छोट्या फॉरमॅट खेळताना कमी बॉलमध्ये जास्त धावा करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे पुनरागमन करताना षटकार आणि चौकारांसह पुनरामन करीत आपल्यातल्या क्लास दाखवण्यासाठी पुजारा षटकार मारण्याचा कसून सराव करत आहे.

(IPL 2021 Cheteshwar Pujara Says Thank You Channai Super Kings And MS Dhoni)

हे ही वाचा :

IPL 2021 : मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या अडचणी वाढल्या, हे स्टार खेळाडू पहिली मॅच खेळणार नाहीत!

IPL 2021 : रिषभ पंतच्या पाठीवर रिकी पॉटिंगचा हात, समर्थनार्थ ‘खास बात!’

रिषभ पंतला सर्वात मोठी लॉटरी, थेट कर्णधारपदी नियुक्ती

Follow Us
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....
Shivsena : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, जो आडवा येईल.....; त्या बड्या नेत्याचं मोठं विधान
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...