AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T 20 Series | टेस्ट, वनडे सीरिजनंतर आता टी 20 मालिकेसाठी टीम जाहीर, या खेळाडूकडे कर्णधारपद

T 20I Series 2023 | निवड समितीने टी 20 मालिकेसाठी 16 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. अवघ्या 24 वर्षांच्या खेळाडूला या टी 20 मालिकेचं कर्णधारपद देण्यात आलं आहे.

T 20 Series | टेस्ट, वनडे सीरिजनंतर आता टी 20 मालिकेसाठी टीम जाहीर, या खेळाडूकडे कर्णधारपद
विवाहित महिलेला एक मुलगीही होती मात्र तिचं वैवाहिक आयुष्य काही ठिक नव्हतं. त्यामुळे तिचा प्रेमावरून विश्वासच उडाला होता.
| Updated on: Jul 05, 2023 | 4:13 AM
Share

मुंबई | टीम इंडियाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याचं काउंटडाऊन सुरु झालंय. टीम इंडियाचे खेळाडू हे वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाले आहेत. वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया यांच्यात कसोटी, वनडे आणि टी 20 मालिका खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने या कसोटी आणि वनडे सीरिजसाठी टीम इंडियाचा संघ 23 जून रोजी जाहीर केला होता. मात्र टी 20 सीरिजसाठी अजूनही टीमची घोषणा करण्यात आलेली नाही. या दरम्यान क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

निवड समितीने टी 20 मालिकेसाठी टीमची घोषणा केलीय. निवड समितीने चक्क 24 वर्षांच्या खेळाडूला कर्णधारपद दिलंय. अफगाणिस्तान क्रिकेट टीम सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. उभयसंघात एकमेव कसोटी सामना पार पडला. त्यानंतर आता वनडे आणि टी 20 मालिका पार पडणार आहे. या दोन्ही मालिकांचं वेळापत्रक आणि टी 20 सीरिजसाठी अफगाणिस्तान क्रिकेट संघ जाहीर करण्यात आलाय. आयसीसीने ट्विट करत याबाबतची माहिती दिलीय.

राशिद खान याच्याकडे कॅप्टन्सी

निवड समितीने 24 वर्षीय स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान याच्याकडे टी 20 मालिकेचं नेतृत्व सोपवण्यात आलंय.

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान वनडे सीरिज शेड्युल

5 जुलै, पहिला एकदिवसीय, चट्टोग्राम

8 जुलै, दुसरी वनडे, चट्टोग्राम

11 जुलै, तिसरा एकदिवसीय, चट्टोग्राम

बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान टी 20 मालिका वेळापत्रक

14 जुलै, पहिला सामना, सिलहट

16 जुलै, दुसरा सामना, सिलहट

बांगलादेश विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम अफगाणिस्तान | रशीद खान (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज, हजरतुल्ला झझाई, मोहम्मद शहजाद, इब्राहिम जद्रान, मोहम्मद नबी, नजीबुल्ला झदरन, सेदिक अटल, करीम जनात, अजमातुल्ला उमरझाई, फजलहक फारुकी, नवीन-उल-हक, वफादर मोमांद, फरीद अहमद मलिक, नूर अहमद आणि मुजीब उर रहमान.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.