AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rishabh Pant: ऋषभने भेटीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना एक गोष्ट सांगताच, रातोरात बदल

Rishabh Pant: ऋषभ पंतने उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना अशी कुठली गोष्ट सांगितली, ज्यामुळे एक यंत्रणा ताबडतोड Action मोडमध्ये आली

Rishabh Pant: ऋषभने भेटीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांना एक गोष्ट सांगताच, रातोरात बदल
| Updated on: Jan 02, 2023 | 11:55 AM
Share

मुंबई: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारचा शुक्रवारी सकाळी भीषण अपघात झाला. या अपघातातून ऋषभ सुदैवाने बचावला. पण तो गंभीर जखमी झाला आहे. या दुर्घटनेनंतर ऋषभच्या कारचा अपघात कसा झाला? या प्रश्नावर चर्चा सुरु आहे. पोलिसांनी कार चालवताना ऋषभचा डोळा लागल्यामुळे अपघात झाला, असं म्हटलय. याच प्रश्नाच उत्तर शोधताना रस्त्यावरील खड्डे सुद्धा ऋषभच्या अपघाताला कारण ठरल्याच बोललं जातय.

NHAI तात्काळ Action मोडमध्ये

रस्त्यावरील खड्डे अपघाताच एक कारण असल्याच समोर आल्यानंतर NHAI तात्काळ Action मोडमध्ये आली. त्यांनी तात्काळ अपघातस्थळी असलेले खड्डे भरले. सध्या ऋषभवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.

पुष्कर सिंह धामी काय म्हणाले?

ऋषभ पंतने दिलेल्या जबानीच्या आधारावर उत्तराखंड पोलिसांनी डोळा लागल्यामुळे अपघात झाल्याच म्हटलं होतं. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी, ऋषभ पंतला भेटल्यानंतर रुग्णालयात पत्रकारांशी वार्तालाप केला. “पंतने सांगितलं की, तिथे काही खड्डे होते, जे अंधारात अचानक समोर आले. ते खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात कार डिवायडरला धडकली” असं धामी म्हणाले. पंतची तब्येत आता चांगली आहे. पंतला मिळणाऱ्या मेडिकल ट्रीटमेंटवर त्याचं कुटुंब समाधानी असल्याचं धामींनी सांगितलं.

स्थानिकांच म्हणणं काय?

पंतला भेटून आल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या खड्डयांचा उल्लेख केला, स्थानिक लोकांच तेच म्हणणं आहे. रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे त्या जागेवर मृत्यू होत असल्याचं स्थानिकांच म्हणणं आहे. आतापर्यंत अनेक दुर्घटना तिथे झाल्या असून अनेकांनी आपले प्राण गमावलेत. रातोरात झाली दुरुस्ती

अजूनपर्यंत तरी कोणीही त्या खड्ड्यांबद्दल काहीही करायला तयार नव्हतं. पण पंतच्या अपघाताची चर्चा सुरु होताच, NHAI ने रातोरात ते खड्डे भरले. जणू त्या रस्त्यावर खड्डे नव्हतेच. पंतच्या कार अपघातात तिथली एक रेलिंग तुटली होती. ती सुद्धा दुरुस्त करण्यात आली.

ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात.
परबांकडून कुणाचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख? सत्ताधाऱ्यांचा गदारोळ
परबांकडून कुणाचा भाडोत्री मंत्री असा उल्लेख? सत्ताधाऱ्यांचा गदारोळ.
नाहीतर घरी बसाव लागेल, लाडक्या बहिणीवरून फडणवीसांनी भाजप आमदाराला झापल
नाहीतर घरी बसाव लागेल, लाडक्या बहिणीवरून फडणवीसांनी भाजप आमदाराला झापल.
विधान परिषदेत अनिल परब भडकले, सभागृहात एकच गदारोळ, नेमकं घडलं काय?
विधान परिषदेत अनिल परब भडकले, सभागृहात एकच गदारोळ, नेमकं घडलं काय?.
CSMT स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार, फडणवीसांची मोठी घोषणा
CSMT स्थानकावर शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार, फडणवीसांची मोठी घोषणा.
तुकाराम मुंढे यांचं हे कृत्य... भाजप नेत्याच्या आरोपानं खळबळ अन्....
तुकाराम मुंढे यांचं हे कृत्य... भाजप नेत्याच्या आरोपानं खळबळ अन्.....
विधानभवन परिसर विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणलं अन् सरकारला घेरलं
विधानभवन परिसर विरोधकांच्या घोषणाबाजीनं दणाणलं अन् सरकारला घेरलं.
त्यांची गडगंड संपत्ती, 35 वकिलांची फौज अन्...सुरेश धस काय म्हणाले?
त्यांची गडगंड संपत्ती, 35 वकिलांची फौज अन्...सुरेश धस काय म्हणाले?.
दानवेंचा 'कॅश बॉम्ब' अन विरोधकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा; एवढ्या नोटा..
दानवेंचा 'कॅश बॉम्ब' अन विरोधकांचा सत्ताधाऱ्यावर निशाणा; एवढ्या नोटा...
पालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार! फडणवीस-शिंदेंमध्ये दीड तास चर्चा
पालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार! फडणवीस-शिंदेंमध्ये दीड तास चर्चा.