AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajaz Patel | धक्कादायक! मुंबईत एका डावात 10 विकेट घेणाऱ्या एजाजला न्यूझीलंडने वगळलं

भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेत अष्टपैलू राचिन रविंद्रनेही लक्ष वेधून घेतले होते. आता 13 सदस्यीय संघात राचिन रविंद्रच्या रुपाने न्यूझीलंडकडे फिरकीचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे.

Ajaz Patel | धक्कादायक! मुंबईत एका डावात 10 विकेट घेणाऱ्या एजाजला न्यूझीलंडने वगळलं
Ajaz Patel
| Edited By: | Updated on: Dec 23, 2021 | 1:45 PM
Share

मुंबई: डिसेंबर महिन्यात मुंबईत झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा (New Zealand) फिरकीपटू एजाज पटेलने (Ajaz Patel) इतिहास रचला होता. त्याने एका डावात भारताच्या 10 विकेट घेतल्या होत्या. इतकी अव्वल दर्जाची कामगिरी करुनही, न्यूझीलंडने आता मायदेशात होणाऱ्या बांगलादेश विरुद्धच्या सामन्यातून एजाज पटेलला डच्चू दिला आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एका डावात 10 विकेट घेणारा एजाज तिसरा क्रिकेटपटू आहे. त्याने दोन्ही डावात 67 षटकं गोलंदाजी करुन एकूण 14 विकेट घेतल्या होत्या.

भारताविरुद्धच्या या कसोटी मालिकेत अष्टपैलू राचिन रविंद्रनेही लक्ष वेधून घेतले होते. आता 13 सदस्यीय संघात राचिन रविंद्रच्या रुपाने न्यूझीलंडकडे फिरकीचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. न्यूझीलंडमध्ये ही कसोटी मालिका होणार आहे.

केन विलियमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम संघाचे नेतृत्व करणार आहे. टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यादरम्यान केनच्या दुखापतीने उचल खाल्ली होती. त्यामुळे त्याला भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेत खेळता आले नाही. दुखापतीमुळे केन दीर्घकाळासाठी संघाबाहेर राहू शकतो, त्याच्यावर शस्त्रक्रियाही होऊ शकते, असे न्यूझीलंडचे कोच गॅरी स्टीड यांनी म्हटले होते.

दुसऱ्या कसोटीत दहा विकेट घेणाऱ्या एजाज पटेलचं वानखेडे स्टेडियमवर प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडात कौतुक केलं होतं. कर्णधार विराट कोहली, हेड कोच राहुल द्रविड यांनी न्यूझीलंडच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन एजाजचं कौतुक केलं होतं. न्यूझीलंडमधील वातावरण, परिस्थिती लक्षात घेऊन एजाजचा संघात समावेश करण्यात आलेला नाही.

संबंधित बातम्या:

आदित्य ठाकरेंना धमकी, मी स्वत: कर्नाटकात जातो, फडणवीसांचा शब्द, रजा अकादमी, सनातनवरही मोठं वक्तव्य VIDEO: हिंमत असेल तर अविश्वास ठरावा आणाच, तुमच्यासोबत कोण ते तरी कळेल?; नवाब मलिकांचा टोला भेटीत तृष्टता मोठी…कालच्या वादावादीनंतर आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगल्या गुजगोष्टी…!

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती