AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup 2023 | आशिया कपआधी टीमच्या अडचणीत वाढ, तगडा मॅचविनर प्लेअर स्पर्धेतून ‘आऊट’?

Asia Cup 2023 : आशिया कप 2023 तोंडावर आला असताना टीमच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. टीमचा मोठा प्लेअर स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे.

Asia Cup 2023 | आशिया कपआधी टीमच्या अडचणीत वाढ, तगडा मॅचविनर प्लेअर स्पर्धेतून 'आऊट'?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 27, 2023 | 6:03 PM
Share

मुंबई : आशिया कप 2023 तोंडावर आला असताना टीमच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. टीमचा मोठा प्लेअर स्पर्धेतून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. तीन दिवसांनी म्हणजेच 30 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानसोबत 2 ऑगस्टला होणार आहे. मात्र मोठ्या स्पर्धेला सुरू व्हायला काही दिवस बाकी असताना संघाच्या ओपनर खेळाडूबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

कोण आहे तो खेळाडू?

आशिया सुरू होण्याआधी बांगलादेश संघाचा आक्रमक सलामीवीर लिटन दास आजारी पडला आहे. बांगलादेशचा लिटन दास हा स्टार खेळाडू असून अचानक त्याची तब्येत बिघडल्याने संघाची चिंता वाढली आहे. ओपनिंगला येत संघाला एक तगडी सुरूवात तो आपल्या बॅटींगने करूव देतो. लिटन दास आजारी असल्यामुळे रविवारी श्रीलंकेला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये तो टीमसोबत बसू शकला नाही. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.

लिटन दासची डेंग्यू चाचणी केली आहे ती जर नॉर्मल आली तर तो पुढील विमानाने श्रीलंकेला रवाना होईल. पण जर त्याची तब्येत आणखीन बिघडली तर त्याची जागी दुसऱ्या खेळाडूला रिप्लेस म्हणून पाठवलं जाईल, अशी माहिती बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या संचालन समितीचे अध्यक्ष जलाल युनूस यांनी दिली आहे. बांगलादेशचा पहिला सामना 31 ऑगस्टला श्रीलंकेसोबत होणार आहे.

आशिया कप 2023 साठी बांगलादेशचा संघ : मुशफिकुर रहीम, अफिफ हुसेन, मेहिदी हसन मिराझ, तस्किन अहमद, शकीब अल हसन (C), लिटन दास, नजमुल हुसेन शांटो, तौहिद हृदोय, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शॉरीफुल इस्लाम, तन्झीद हसन, तनझिम हसन, नसुम अहमद, महेद हसन. , मोहम्मद नईम, शमीम हुसेन

Follow Us
आजच्या महाराष्ट्र बातम्या: शिवसेना सुनावणी, राजकीय घडामोडी
महाराष्ट्रातील ताज्या बातम्या: राजकीय घडामोडी, हवामान अंदाज आणि महत्त्वाचे निर्णय
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?